शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

आयकरदात्यांची संख्या वाढली; मात्र नागपूर विभागात ३६५ पदे रिक्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 30, 2024 23:41 IST

माहितीच्या अधिकारात बाब उघड : कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : प्रधान मुख्य आयकर आयुक्त (पीसीसीआयटी) नागपूर विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ३६५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. एकीकडे देशात आयकरदात्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रिक्त पदे भरण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयातर्फे पुढाकार घेण्यात येत नसल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर कार्यालयातील दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत रिक्त पदांची संख्या ३६५ आहे. ही संख्या ३१ मार्च २०१४ पर्यंत २७६ होती. दहा वर्षांच्या कालावधीत रिक्त पदांच्या संख्येत ८९ ने वाढ झाल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) अर्जावर पीसीसीआयटी, नागपूर कार्यालयाने माहिती दिली.कोलारकर म्हणाले, दहा वर्षांनंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. कर्मचारी मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कार्यरत असून त्यांच्या खांद्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळेच देशात आयकर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आयकर विभागात खूपच कमी कर्मचारी असल्याची माहिती आहे. याच कारणांनी आयकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण वाढला आहे. 

प्राप्त आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२४ पर्यंत आयकर नागपूर कार्यालयात १,२३४ पदे मंजूर असून त्यापैकी ८६९ पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आणि ३६५ पदे रिक्त आहेत. तर ३१ मार्च २०१४ च्या आकडेवारीनुसार ९९० पदे मंजूर होती. त्यापैकी ७१५ पदांवर कर्मचारी कार्यरत होते आणि २७६ पदे रिक्त होती. सरकार देशात आयकरदात्यांची संख्या वाढविण्यावर भर देत आहे, तर दुसरीकडे करदात्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी-कमी होत आहे. ही या विभागाची शोकांतिका आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. भरती प्रक्रियेने उच्च शिक्षितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे कोलारकर यांनी सांगितले.

दिनांक मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे१ जाने.-२४ १,२३४ ८६९ ३६५३१ मार्च-१४ ९९० ७१५ २७६

टॅग्स :nagpurनागपूर