शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडणारा माथेफिरू गजाआड, मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने बांधल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 02:12 IST

जगन अर्जून भाले (वय ३७) असे आरोपीचे नाव असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला मुंब्रा येथून आज १२ फेब्रुवारीला अटक केली...

नागपूर : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप सोडून प्रवाशांसह रेल्वे प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या माथेफिरूचा अखेर तब्बल दीड महिन्यानंतर छडा लागला. जगन अर्जून भाले (वय ३७) असे आरोपीचे नाव असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला मुंब्रा येथून आज १२ फेब्रुवारीला अटक केली.प्रवाशीच नव्हे तर रेल्वे प्रशासनाला हादरवून सोडणारी ही घटना २७ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. सीएसएमटी-सोलापूर दरम्यान धावणाऱ्या ट्रेन नंबर २२२२५च्या कोच नंबर सी-१६ च्या शौचालयात एक साप आढळला होता. माहिती कळताच रेल्वेची अख्खी यंत्रणाच सापाला पकडण्यासाठी कामी लागली होती. अखेर सोलापूर स्थानकावर साप ट्रेनच्या बाहेर काढण्यात यश आले होते. साप ट्रेनमध्ये पोहचलाच कसा, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रेल्वे यंत्रणांनी तपास सुरू केला.सीसीटीव्हीच्या माध्यमातून साप ट्रेनमध्ये शिरला नाही तर त्याला एका माथेफिरून ट्रेनमध्ये आणून सोडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४५(ब), १४७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला जाऊ लागला. तब्बल दीड महिन्याच्या तपासानंतर मध्य रेल्वेच्या आरपीएफला लिड मिळाली आणि त्या आधारे आज मुंब्रा येथे आरोपी जगन अर्जुन भाले याला अटक केली. चौकशीदरम्यान तो नाशिकचा रहिवासी असून, विकृत वृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले.गुन्ह्याची कबुली, १४ दिवसांची कोठडी -आरोपी जगन भाले याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची दंडाधिकारी कोठडी (एमसीआर) दिल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने आज दिली आहे. 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसPoliceपोलिस