शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अन् महामार्गावरच मांडले बिबट्याने ठाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 10:55 IST

दुचाकीस्वाराला आपल्यासमोर अगदी थाटात बिबट बसला असल्याचे दिसताच त्याची पाचावर धारण बसली

नागपूर : जंगलात वाढलेला मानवी शिरकाव आणि दळणवळणाच्या सुविधेसाठी जंगलाच्या मधूनच होणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामामुळे मानव आणि वन्यप्राण्यांतील संघर्ष वाढताना दिसत आहे. चतुष्पाद वर्गातील व्याघ्र परिवारातील बिबट हा हिंस्र प्राणी तर आता राजरोस शहरात शिरतानाही आढळतो.

मंगळवारी रात्री एक बिबट महामार्गावरच ठाण मांडून बसलेला असतो. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला तो दिसणार नाही म्हणून एका कारचालकाने वाहन तेथेच थांबवून त्याच्यावर हेडलाइट रोखून ठेवले होते. शेजारीच एक बसही थांबली होती, असे असतानाही विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला तिथे बिबट बसला असल्याचे दिसले नाही आणि अगदी पाच-सात पावलांवर असतानाच दुचाकीस्वाराला आपल्यासमोर अगदी थाटात बिबट बसला असल्याचे दिसताच त्याची पाचावर धारण बसली आणि आल्यापावली दुचाकी वळवून तो फुर्रर्र झाला.

हे सर्व चित्रण कारचालकाने मोबाइलमध्ये कैद केले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, ही घटना कोराडी मार्गावरील नांदा फाटा तलावाच्या जवळील पुलाजवळ असल्याचे सांगितले जात आहे, तर काही जण सावनेर पुलाजवळचा असल्याचे सांगत आहेत. काही जणांनी हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याचाही दावा केला आहे. मात्र, व्हिडीओतील भाषा ही वैदर्भीय टच असलेल्या हिंदीतील आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर