शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘कुणबी’ केल्यास नांगर घेऊन उतरू; ओबीसी संघटनांचा इशारा, तीन पिढ्यांची कागदपत्रे पडताळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 07:54 IST

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने  अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

नागपूर : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू असल्याने विदर्भातील ओबीसींमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसींमध्ये करू नका, अशी ठाम भूमिका मांडत तसे झाल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू, असा इशारा कुणबी व ओबीसी संघटनांनी दिला आहे. 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, कोणत्याही व्यक्तीकडे वडील, आजोबा, पणजोबा असे तीन पिढीतील कुणीही कुणबी समाजाचे होते, असा कागदोपत्री पुरावा असेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आजही तरतूद आहे; पण तीन पिढ्यांचा पुरावा मिळत नसेल तर सरकार कुणाचेही असो ते कुणबी प्रमाणपत्र देऊच शकत नाही. त्यामुळे त्यांचा ओबीसीमध्ये समावेश होऊ शकत नाही. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा सरसकट निर्णय घेता येणार नाही. 

समितीने कुणबी संघटनांशीही चर्चा करावीमराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी राज्य सरकारने  अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने सरकारला अहवाल सादर करण्यापूर्वी विदर्भातील कुणबी व ओबीसी संघटनांशी चर्चा करावी, अशी मागणी कुणबी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

ओबीसी ५२ टक्के असतानाही २७ टक्के आरक्षण मिळते. आता पुन्हा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका चुक आहे.  - राजेश काकडे, विदर्भ अध्यक्ष, जगद्गुरू तुकाराम महाराज सेवा समिती

दरवेळी नव्या जातींचा ओबीसींत समावेश केला जातो. ही बाब कुणबी समाज यापुढे कदापि सहन करणार नाही. - सुरेश गुडधे पाटील, संस्थापक अध्यक्ष, बहुउद्देशीय तिरळे कुणबी संस्था 

आरक्षणातील आमचा वाटा दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न झाला तर कुणबी समाज नांगर घेऊन रस्त्यावर उतरेल.   - पुरुषोत्तम शहाणे,  अध्यक्ष, अ.भा. कुणबी समाज  

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण