शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरातील कुडकुडत्या थंडीत तापला आमदार निवासातील गिझरचा मुद्दा

By योगेश पांडे | Updated: December 17, 2024 17:06 IST

Nagpur : अधिवेशन काळात विधानभवनात गर्दी; लॉबीतून आमदारांनाच जायला जागा उरेना

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत थंडीची कुडकुड वाढली असताना विधीमंडळ अधिवेशनासाठी आमदार निवासात थांबलेल्या आमदारांच्या डोक्याचा मन:स्ताप वाढला आहे. कडाक्याच्या थंडीत आमदारांना गरम पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने गिझरच्या पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली आणि वेळेवर बैठकांना जाता आले नाही असा मुद्दा विधानपरिषदेत समोर आला.

अमोल मिटकरी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनअंतर्गत हा मुद्दा मांडला. आमदार निवासात मोठ्या प्रमाणावर गैरसोय दिसून येत आहे. मंगळवारी सकाळी वीज खंडीत झाल्याने गिझर बंद पडले. त्यामुळे ऐन घाईच्या वेळेला अनेक आमदारांची गैरसोय झाली. काही आमदार मोठ्या हॉटेलात राहत असले तरी अनेक जण अद्यापही आमदार निवासातच थांबलेले आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी मिटकरी यांनी केले. असे विषय हे दालनात येऊन मला किंवा सचिवांना सांगता येतात. तुम्ही तर जुने सदस्य आहात. त्यामुळे सभागृहात असे मुद्दे उठवता व त्याला प्रसिद्धी मिळते. मात्र तरीदेखील याची गंभीर दखल घेऊन संबंधितांना सूचना देण्यात येईल, असे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. यावर सेनेचे अनिल परब यांनीदेखील हा मुद्दा लावून धरला. मागील तीन दिवसांपासून गिझर बंद असल्याचा दावा त्यांनी केला.

लॉबीतून आमदारांनाच जायला जागा उरेनाअधिवेशन काळात विधानभवनात गर्दी होते. नागपुरातील विधानभवन तुलनेने लहान आहे. विधीमंडळातील लॉबीत मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित असतात. त्यामुळे आमदारांना जायलादेखील जागा उरत नाही. त्यामुळे याबाबत कारवाई करावी, अशी मागणी विक्रम काळे यांनी केले. राज्यातील लोक लांबून निवेदने घेऊन येत असतात. शिष्टमंडळांना आमदारांच्या सांगण्यावरूनच पासेस दिले जातात. मात्र लॉबीत गर्दी होणार नाही याची सूचना देण्यात येईल, असे उपसभापतींनी स्पष्ट केले.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूरMLAआमदारAnil Parabअनिल परब