शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

'नफीस'च्या माध्यमातून तयार होत आहे देशभरातील गुन्हेगारांची कुंडली, जीआरपीकडून अनेक राज्यात सिस्टमचा वापर

By नरेश डोंगरे | Updated: March 12, 2026 23:16 IST

Nagpur Crime News: गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या दंडूक्यापासून वाचण्यासाठी गुन्हेगार नाव बदलू शकतो, पत्ता बदलू शकतो, स्वत:चा चेहरादेखिल बदलू शकतो. मात्र, स्वत:च्या हाताच्या बोटांचे ठसे तो बदलू शकत नाही. हा महत्वाचा धागा धरून जीआरपीने (शासकीय रेल्वे पोलिस) आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

- नरेश डोंगरेनागपूर - गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या दंडूक्यापासून वाचण्यासाठी गुन्हेगार नाव बदलू शकतो, पत्ता बदलू शकतो, स्वत:चा चेहरादेखिल बदलू शकतो. मात्र, स्वत:च्या हाताच्या बोटांचे ठसे तो बदलू शकत नाही. हा महत्वाचा धागा धरून जीआरपीने (शासकीय रेल्वे पोलिस) आता नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. 'नफीस'नामक या प्रणालीमुळे देशातील कोणत्याही भागात कोणत्याही ट्रेनमध्ये अथवा रेल्वे स्थानकावर गुन्हेगाराने कोणताही गुन्हा केला तर त्याचा लगेच छडा लावण्यास मदत होणार आहे.

अलिकडे रेल्वेतील गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत आहे. ट्रेनमध्ये हत्या, बलात्कार, हाणामारी, लुटमार आदी गुन्ह्यांचा आकडा सारखा वाढतच असून, एका प्रांतात धावत्या ट्रेनमध्ये गुन्हे केल्यानंतर आरोपी दुसऱ्या प्रांतात पळून जात असल्याने त्यांचा छडा लावण्याचे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान वारंवार उभे ठाकत आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी जीआरपीने नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम (नफीस) या सिस्टमचा वापर सुरू केला आहे. या प्रणालीतून गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे देशातील सर्वात मोठ्या डिजिटल नेटवर्कमध्ये नोंदवले जाते. देशभरातील गुन्हेगारांच्या फिंगरप्रिंटचा हा सर्वात मोठा केंद्रीकृत डेटाबेस नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) मार्फत चालवला जातो. आतापर्यंत विविध सुरक्षा यंत्रणा आणि राज्यांतील पोलीस याचा वापर करत होते. आता महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील जीआरपीनेही त्याचा वापर सुरू केला आहे.

प्रत्येक गुन्हेगाराची १० अंकी ओळखया प्रणालीअंतर्गत प्रत्येक गुन्हेगाराला १० अंकी नॅशनल फिंगरप्रिंट नंबर (एनएफएन) दिला जात आहे. त्या आधारे गुन्हेगाराची कुंडली एका क्लिकवर समोर येईल. एखाद्या गुन्हेगाराने १० वर्षांपूर्वी कुठेही गुन्हा केला असला, वेगवेगळ्या राज्यांत गुन्हे केले असले आणि वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवल्या असल्या तरी सर्व नोंदी एकाच क्रमांकाशी जोडल्या जातात. यातील पहिले दोन अंक गुन्हेगाराला प्रथम कोणत्या राज्यात अटक झाली हे दर्शविणार आहेत.

नागपुरात महिनाभरात १६ जणांची 'कुंडली' तयारअटक केलेल्या प्रत्येक गुन्हेगाराचे फिंगरप्रिंट नफीसमध्ये अपलोड केले जात आहेत. नागपुरात महिनाभरात १६ गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे आता गुन्हेगार कुठेही पळून गेला तरी त्याच्या बोटांचे ठसेच पोलिसांना त्याच्या मानगुटीपर्यंत पोहचविणार आहे. विशेष सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आवश्यक असल्याने नफीससाठी तूर्त शहर पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गाैरव गावंडे यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : GRP uses 'NAFIS' to track criminals nationwide via fingerprints.

Web Summary : GRP uses 'NAFIS,' a fingerprint system, to identify criminals across India. This national database helps solve railway crimes, linking past offenses to a single ID, aiding investigations.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर