शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीयांचं कार्य महान; मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नागपुरात अवयवदान

By सुमेध वाघमार | Updated: August 19, 2023 19:35 IST

मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव.

नागपूर : मानवी जीव वाचविण्यासाठी अवयवदानाच्या अनन्यसाधारण महत्त्व आता समाजात रुजायला लागले आहे. शेतकरी कुटुंबही अवयवदानासाठी पुढाकार घेऊ लागल्याने अवयव निकामी होऊन मृत्यूच्या दाडेत जगणाऱ्यांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यप्रदेशातील एका शेतकºयाचे नागपुरात अवयवदान झाले. यामुळे तिघांना नवे जीवन तर दोघांना दृष्टी मिळाली.     मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. सवाई हे व्यवसायाने शेतकरी होते. शेतातील काम करून करून घरी परत येत असताना दुचाकीवरून तोल गेल्याने ते खाली पडले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. प्रथम उपचाराकरिता पांढूर्णा येते नेण्यात आले. परंतु प्रकृती खालवल्याने त्यांना १४ ऑगस्ट रोजी नागपूरच्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’त  (एम्स) दाखल केले. तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या एका पथकाने त्यांना तपासून ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषीत केले. 

‘एम्स’चे अवयव प्रत्यारोपण समन्वयक प्रितम त्रिवेदी आणि प्राची खैरे यांनी सवाई यांच्या कुटुंबियांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. पत्नी राधिका व मुलगा विशाल सवाई यांनी अवयवदानासाठी होकार दिला. याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक दिनेश मंडपे यांनी ‘झेडटीसीसी’च्या यादीनुसार गरजू रुग्णांना दोन किडनी, लिव्हर आणि कॉर्निआचे दान केले. 

टॅग्स :nagpurनागपूरMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरAIIMS hospitalएम्स रुग्णालय