शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

संशयावरून पकडलेल्या आरोपीच्या खिशात निघाले पिस्तुल

By योगेश पांडे | Updated: February 27, 2024 17:52 IST

संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तुल निघाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

योगेश पांडे, नागपूर : संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तुल निघाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना मस्कासाथ मार्गावरील बंगालीपंजा येथील मेमन जमात हॉलच्या गल्लीत दोन व्यक्ती संशयास्पदरित्या बसलेले दिसले. पोलीस तेथे पोहोचले असता एक आरोपी फरार झाला तर दुसरा आरोपी ताब्यात आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून पिस्तुल, दोन जिवंत काडतुसं आढळली. गणेश विश्वनाथ तलवारे (३०, चांद मोहल्ला, बंगालीपंजा) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचा सहकारी फहीम उर्फ गुड्डू शेख (बंगालीपंजा) हा फरार आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मागील आठवड्यात याच पद्धतीने एका आरोपीकडेदेखील पिस्तुल सापडले होते. तो आरोपी साथीदारांसोबत व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी बाहेरील राज्यातून नागपुरात आला होता. खुलेआमपणे पिस्तुल घेऊन गुन्हे करण्यासाठी फिरणाऱ्या आरोपींमुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस