शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन युवतीचा विनयभंग

By दयानंद पाईकराव | Updated: July 22, 2023 15:07 IST

पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीस अटक

नागपूर : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊनयुवतीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पाचपावली पोलिसांनी गजाआड केले आहे.

शरद भोमदेव वर्मा (वय २१,रा.नयापूरा, प्रेमनगर, झेंडा चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या युवतीची ओळख आरोपीसोबत २० जुलै रोजी इन्स्टाग्रामवर झाली होती. आरोपी शरद हा मॅक्सी ऑटो चालवितो. तर युवती डीएमएलटीला शिकत आहे. ओळख झाल्यानंतर आरोपी तिच्याशी नियमित चॅटींग करीत होता. तो तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावित होता. परंतू युवती त्याला नकार देत होती.

घटनेच्या वेळी युवती सिताबर्डी येथे गेली असता आरोपी शरद मॅक्सी ऑटो घेऊन तिच्या जवळ आला. त्याने तिला ऑटोत बसण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे ती ऑटोत बसली. आरोपी तिला पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

युवतीने विराेध केला असता आरोपीने तिला थापडा मारून शिविगाळ करून तिचा फाेन जमीनीवर आपटुन नुकसान केले व फाेटाे व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पाचपावलीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण सोमवंशी यांनी आरोपीविरुद्ध कलम ३५४, ३५४ (अ), ३२३, ४२७, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर