शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील पहिली फूट अन् नागपुरातील भुजबळांचा शपथविधी

By shrimant mane | Updated: December 14, 2024 11:35 IST

Nagpur : सहा उपमंत्र्यांनीही घेतली होती शपथ

श्रीमंत माने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रविवारी, १५ डिसेंबरला नागपूरमध्ये होणारा महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासातील दुसराच प्रसंग असेल. तेहतीस वर्षांपूर्वी, डिसेंबर १९९१ मध्ये शिवसेनेच्या पहिल्या बहुचर्चित फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ व डॉ. राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या आणखी पाच मंत्र्यांनी नागपूरमध्ये पहिल्यांदा शपथ घेतली होती. यानिमित्ताने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीन दशकांपूर्वीच्या शपथविधीच्या आठवणींना 'लोकमत'शी बोलताना उजाळा दिला.

कॅबिनेट मंत्री भुजबळ तसेच बुलढाण्याचे डॉ. गोडे यांच्यासोबत अमरावतीच्या वसुधाताई देशमुख, आमगावचे भरत बाहेकर, ठाण्याचे शंकर नम, बीडचे जयदत्त क्षीरसागर व धुळ्याच्या शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी २१ डिसेंबर १९९१ रोजी नागपूरमध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. स्व. सुधाकरराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री होते. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळीच ५ डिसेंबर १९९१ रोजी शिवसेनेतील पहिल्या फुटीचे महाभारत घडले होते. वर्षभर आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५२ आमदार निवडून आले होते. १४१ आमदारांचा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या वाट्याला आले. मनोहर जोशी यांच्या नावाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौल दिला. त्याचवेळी मंडल आयोगाचा मुद्दा देशपातळीवर ऐरणीवर आला होता. भुजबळांनी त्या मुद्द्यावर बंड केले.

त्याबद्दल भुजबळ सांगतात, आधी शिवसेनेचे तब्बल ३६ आमदार आपल्यासोबत होते. तथापि, बाळासाहेबांच्या भीतीने नंतर १८ उरले. प्रत्यक्ष बाहेर पडताना बाराच शिल्लक राहिले. ही संख्या एकतृतीयांशपेक्षा कमी होती. म्हणजे आपली आमदारकी गेली, असे समजून आम्ही निराश झालो. बाळासाहेब व शिवसैनिकांच्या भीतीने आम्ही लपून होतो. सगळ्यांच्याच जिवाला धोका होता. तथापि, कसेबसे वाचलो आणि मी व डॉ. गोडे यांनी इतरांसोबत शपथ घेतली. मला महसूल, तर उपमंत्री डॉ. गोडे यांना गृहखाते मिळाले. माझी इच्छा गृहखात्याच्या कॅबिनेटची होती. परंतु ते मुख्यमंत्र्यांकडेच राहते, असे सुधाकरराव म्हणाले. मुंबईचा महापौर असल्याने नगरविकास ही दुसरी पसंती होती. पण, ते सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे होते. अखेर गावखेड्यातून आलेल्या समर्थकांच्या सूचनेवरून महसूल स्वीकारले. ते आधी शंकरराव कोल्हे यांच्याकडे होते.

मधुकरराव चौधरींचा ऐतिहासिक निवाडा शिवसेनेतील या फुटीसंदर्भात तत्कालीन विधानसभाध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी दिलेल्या ऐतिहासिक निकालाचे महत्त्व मोठे होते, असे सांगून छगन भुजबळ म्हणाले की, आपल्यापुढे आलेल्या आमदारांची संख्या १८ म्हणजे शिवसेनेच्या फुटीर गटाला मान्यतेसाठी पुरेशी होती. त्यातील ६ नंतर फुटले तर ती संख्यादेखील एकतृतियांशपेक्षा अधिक असल्याने कोणीही अपात्र ठरत नाही, हा निकाल चौधरींनी दिला आणि सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शिवसेनेचे आक्रमक आमदार अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. मधुकरराव चौधरींच्या जिवाला धोका निर्माण झाला. तेव्हा, तुम्हाला मला मारायचे असेल तर मारा; पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असे बाणेदार उत्तर चौधरी यांनी दिले. नंतर त्यांचा हा निर्णय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन