शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

भरकटलेले विमान महिला पायलटने चक्क 'टॅक्सी वे'वर उतरवले

By नरेश डोंगरे | Updated: November 21, 2023 23:21 IST

भयावह दुर्घटना टळली : गोंदिया फ्लाईंग क्लबचे होते विमान

नरेश डोंगरे नागपूर : येथील विमानतळाच्या रन-वे वर विमानाचे लॅण्डिंग करण्याऐवजी एका लेडी पायलटने भरकटलेले विमान चक्क मिहानमधील 'टॅक्सी वे'वर उतरवले. गोंदिया आणि नागपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांसह अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेने विमानतळ प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

इंदिरा गांधी उड्डाण अकादमीच्या एका महिला पायलटने मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून नागपूर विमानतळाकडे झेप घेतली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर या छोट्या प्रशिक्षण विमानाला काही वेळेनंतर परत गोंदिया विमानतळावर जायचे होते. दरम्यान, एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी)शी या विमानाचा संपर्क तुटला. त्यामुळे एटीसीने हे विमान नेमके कुठे आहे, याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, भरकटलेले हे विमान चालविणाऱ्या महिला पायलटने दुपारी १ च्या सुमारास विमानतळालगतच्या मिहान - सेझ परिसरातील एमआरओला लागून असलेल्या 'टॅक्सी वे'वर लॅण्ड केले. सुदैवाने टॅक्सी वे गुळगुळीत असल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, प्रशिक्षण देणारे विमान भरकटल्याचे लक्षात येताच संबंधित यंत्रनेत प्रचंड खळबळ निर्माण झाली. दुपारी १ च्या सुमारास भरकटलेल्या विमानाच्या शोधातील अधिकाऱ्यांना एअरपोर्टच्या रन-वे ऐवजी हे विमान भलतीकडेच मात्र सेफ लॅण्ड झाल्याचे कळाले आणि त्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. दुपारी ३.३० च्या सुमारास अन्य एका विमानाने फ्लाईंग क्लबचे अधिकारी नागपुरात पोहचले आणि त्यांनी महिला पायलटशी संपर्क करून माहिती जाणून घेतली. त्यानंतर दुपारी ४.३० च्या सुमारास तिला घेऊन ते गोंदियाला निघून गेले. अन्य एका पायलटने रात्री ८ च्या सुमारास टॅक्सी वे वर उतरलेल्या विमानासह पुन्हा गोंदियाकडे झेप घेतली.

गोंदियाचे फ्लाईंग क्लब अन् दुर्घटना

मार्च २०२३ मध्ये गोंदियाच्याच दुसऱ्या फ्लाईंग क्लबचे एक विमान बालाघाट जिल्ह्यातील किरणापूरजवळ एका पर्वताला धडकले होते. त्या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला होता. तर, २०१७ मध्ये गोंदियाच्याच अन्य एका फ्लाईंग क्लबचे विमान वैनगंगा नंदीत कोसळले होते. त्यात पायलटसह प्रशिक्षकाचाही मृत्यू झाला होता.

एएआय, एमआयएलकडून रिपोर्ट तयार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ निदेशक आबिद रुही (एमआयएल) यांनी या घटनेच्या संबंधाने सांगितले की, या प्रकाराचा अहवाल (रिपोर्ट) तयार करण्यात आला असून तो डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एविएशन यांना पाठविण्यात आला आहे. एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे महाप्रबंधक (समन्वय) जी. के. खरे यांनी सांगितले की त्यांनी असाच अहवाल एएआयच्या मुख्यालयाला पाठविला आहे.