शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर मिळणार डिजिटल लॉकरची सुविधा, जागा निश्चितीवर चर्चा; हजारो प्रवाशांना होणार फायदा

By नरेश डोंगरे | Updated: October 11, 2022 21:40 IST

देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागातील रेल्वेगाड्या जात येत असतात.

नागपूर: ठिकठिकाणच्या हजारो प्रवाशांचे जाणे - येणे असलेल्या येथील मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर लवकरच डिजिटल लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधेमुळे औटघटकेसाठी नागपुरात येणाऱ्या हजारो प्रवाशांना सोयीचे होणार आहे.

देशाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या नागपूररेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागातील रेल्वेगाड्या जात येत असतात. त्यामुळे येथे रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. त्यातील काही प्रवासी व्यवसाय, नोकरी, खरेदीच्या निमित्ताने येथे येतात. त्यामुळे त्यांचा नागपुरातील मुक्काम औटघटकेचा असतो. काम झाले की ते येथून लगेच निघून जातात. त्यांच्यापैकी अनेकजण येथे मोठे सामान घेऊन येतात किंवा येथून सामान खरेदी करून दुसऱ्या ठिकाणी जातात. 

काही वेळच नागपुरात थांबायचे असले तरी रेल्वेगाडीच्या वेळा लक्षात घेता हे सामान त्यांना हॉटेल किंवा लॉजमध्ये ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक फटका बसतो. कारण काही तासांसाठी जरी थांबतो म्हटले तरी हॉटेल किंवा लॉजमध्ये त्यांना पूर्ण दिवसांचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे आर्थिक फटका सहन करा किंवा ते सामान घेऊन सोबत फिरा, हाच पर्याय त्यांच्यापुढे असतो. सामान घेऊन फिरणे संबंधित प्रवाशांसाठी प्रचंड त्रासदायक असते. हा एकूणच प्रकार लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर डिजिटल लॉकरची सुविधा सुरू करण्याची कल्पना आणली आहे. ही सुविधा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. ते आपले सामान लॉकरमध्ये ठेवून विशिष्ट अवधीसाठी बाहेर जाऊ शकतील.

कुठे लावायचे लॉकर? -लॉकरची सुविधा सुरू करायची हे निश्चित झाले असले, तरी ती सुविधा पूर्वेकडे की पश्चिमेच्या बाजुने सुरू करावी, हे अद्याप निश्चित झाले नाही. त्यासंबंधाने दोन्ही प्रवेशद्वाराच्या पर्यायावर वरिष्ठ अधिकारी विचार करीत आहेत.

लवकरच निर्णय -या संबंधाने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. एकदा जागा निश्चित झाली की लॉकर उभारणीला फारसा वेळ लागणार नाही, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विजयकुमार थुल यांनी दिली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी