शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

लिबर्टीज टॉकीजजवळ उड्डाणपुलाचे डिझाइन बदलणार, ४० कोटी झाले मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:29 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : अशोक चौक व मेडिकल चौक सिग्नल मुक्त होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर उड्डाणपुलावर लिबर्टी टॉकीजकडील उतरण्याच्या भागात तांत्रिक त्रुटीमुळे नेहमी वाहनांची कोंडी होते. कामठी रोडवर जाणाऱ्यांना सदर मार्गे किंवा नासुप्र समोरून पुलाच्या खालून जावे लागते. आता ही समस्या सोडविण्यासाठी या उड्डाणपुलाचे डिझाइन बदलण्यात येणार आहे. यासाठी एनएचआयकडून ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी म्हणाले, गेल्या ११ वर्षात नागपूर शहरात उड्डाणपुलांचे जाळे उभारण्यात आले आहे. कमाल चौक ते ताजबागपर्यंत उड्डाणपूल उभारला जात आहे. यात अत्याधुनिक मलेशियन तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. कमाल चौकात ६० कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक भव्य मार्केट तयार केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना येथे दुकाने दिली जातील. अशोक चौकाला ट्रॅफिक सिग्नल मुक्त चौक बनविण्यात आले आहे. मेडिकल चौकातही असाच प्रयोग करण्यासाठी नियोजन झाले आहे. मोमिनपुऱ्याला थेट कडबी चौकाशी उड्डाणपुलाद्वारे जोडले जाईल. शहरातील इतर भागातही उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी माजी खा. अजय संचेती, आ. डॉ. परिणय फुके, आ. संदीप जोशी, माजी आ. सुधाकरराव देशमुख, अनिल सोले, शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभार उपस्थित होते. 

बुटीबोरीत मदर डेअरीचे ८५० कोटींचे काममदर डेअरीचे बुटीबोरी एमआयडीसीमध्ये ८५० कोटींचे काम सुरू झाले आहे. सहास्थितीत २१ हजार लोकांकडून दूध संकलन केले जाते. भविष्यात दूध संकलन ५ लाख लिटरवर नेण्याची योजना आहे. 'धारा' खाद्यतेलाचे उत्पादनदेखील केले जाणार आहे.

४०० नागपुरी साडीनागपुरातील कपडा उद्योग ही एक शहराची ओळख होती. आता धापेवाडा येथे टेक्सटाइल पार्क उभारला जात आहे. येथे हँडलूमचे काम सुरू झाले आहे. लवकरच पॉवरलूम सुरू होईल. येथे १५०० महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. नागपूरच्या साडीच्या रूपात कॉटन साडीची बॅण्डिंग केली जाईल. ही नागपुरी साडी ४०० रुपयांत मिळेल.

टॅग्स :nagpurनागपूर