शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या हक्काचे अन्न ओरबडून खात आहे भ्रष्ट यंत्रणा

By नरेश डोंगरे | Updated: October 14, 2025 20:30 IST

भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात कोट्यवधींची मलाई : गोरगरिबांच्या तक्रारी, ओरड होत आहे बेदखल

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरगरिबांना भुकेचे चटके बसू नये, त्यांच्या पोटाची खळगी भरण्यास त्यांना मदत व्हावी, या हेतूने सरकारकडून 'अंत्योदय तसेच प्राधान्य' योजनेअंतर्गत रेशन वितरित केले जाते. मात्र, हे वितरित करण्याची जबाबदारी असलेली भ्रष्ट यंत्रणा गरिबाच्या हक्काचा घास हिसकावून घेत आहे. या कल्याणकारी योजनेला दलालाच्या माध्यमातून उधळी लावून स्वत:च्या घशात मलाई कोंबत असल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे.

दैनंदिन जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चहापासून साखरेपर्यंत आणि मीठ मिरचीपासून तर अन्नधान्यापर्यंतच्या प्रत्येक चीज वस्तूंची प्रचंड भाववाढ झाली आहे. परिणामी कष्टकरी जनता महागाईच्या आगीत अक्षरश: होरपळून निघत आहे. त्यांचे जगणे थोडेफार सुसह्य व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवितात. अशातीलच एक योजना म्हणजे प्राधान्य तसेच अंत्योदय योजना होय. या योजनेच्या माध्यमातून निराधार, वृद्ध, गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत महिन्याला रेशन दिले जाते. प्राधान्य योजनेअंतर्गत कार्ड धारकांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (१ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ) दिले जाते. अर्थात, ५ जणांचे कुटंब असेल तर एका कुटुंबाला महिन्याला २५ किलो धान्य मिळते. अंत्योदय योजनेअंतर्गत प्रतिकुटुंबाला ३५ किलो (१० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ) धान्य दिले जाते. मात्र, ३० टक्के प्रामाणिक रेशन दुकानदार वगळता उर्वरित दुकानातून गरिबांना त्यांच्या हक्काचे रेशन कधीच पूर्णपणे मिळत नाही.

कार्डधारक आणि रेशन दुकानदार

संबंधित सूत्रांच्या नागपूर शहरात प्राधान्य योजनेचे ३७९२२९ तर अंत्योदय योजनेचे ४६,१६६ कार्डधारक आहेत. या सर्वांना त्यांच्या हक्काचे पूर्ण रेशन मिळावे आणि सार्वजिनक अन्नधान्य वितरण प्रणाली सुरळीत चालावी म्हणून सरकारने प्रत्येक शहरात त्याचे सुटसुटीकरण करून दिले आहे. नागपुरात धंतोली, मेडिकल, महाल, इतवारी, सदर आणि टेका अशी सहा झोन असून त्यात ६५० वर रेशन दुकानदार आहेत.

झारीतील शुक्राचार्य

रेशन कार्डधारक गरीब, निराधारांना धान्याचे वितरण करण्याची जबाबदारी शहरातील रेशन दुकानदारांवर आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक मोबदलाही मिळतो. तर, या सर्वांवर नजर ठेवण्याची जबाबदारी अन्नधान्य पुरवठा विभागाची (एफडीओ) आहे. मात्र, या विभागातीलच काही भ्रष्ट मंडळी झारीतील शुक्राचार्य बनले आहेत. या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काही रेशन दुकानदारांना हाताशी धरून मापात माप मारून गोरगरिबांच्या हाता-तोंडातील घास हिसकावून घेण्याचा दुष्टपणा चालविल्याची चर्चा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Corrupt System Stealing Food Meant for the Poor: A Lokmat Report

Web Summary : A corrupt system deprives the poor of subsidized food rations in Nagpur. Dishonest ration shop owners, aided by corrupt officials, divert essential grains, leaving needy families hungry despite government schemes like Antyodaya and Priority schemes.
टॅग्स :nagpurनागपूरCorruptionभ्रष्टाचारgovernment schemeसरकारी योजना