शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः रुग्णालयात; ट्रकची बस, दुचाकी आणि कारला धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 05:28 IST

११ प्रवासी जखमी 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/ धामना : चाकडोह (बाजारगाव) येथील सोलर कंपनीतील स्फोटाच्या घटनास्थळाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरकडे परत असताना गोंडखैरीच्या बसस्थानकाजवळ मुख्यमंत्र्यांच्या समोर एक अपघात झाल्याचे चित्र त्यांना दिसले. त्या ठिकाणी अपघातामध्ये एक ट्रक आणि दुचाकीची धडक झाली होती. त्याचवेळी त्या ट्रकने कारलाही कट मारला होता. या घटनेपूर्वी अमरावतीहून येणाऱ्या बसला याच ट्रकने धडक दिली होती. त्यात काही प्रवासी जखमी झाले. मात्र, त्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गिरीश केशराव तिडके ट्रकच्या बोनटमध्ये जाऊन अडकला होता व गंभीर अवस्थेत होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव होता. मात्र, त्याला कोणी मदत करत नव्हते.

मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणची गर्दी आणि अपघात पाहताच त्यांचा ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्या ठिकाणी स्वतः खाली उतरले. त्यांनी त्या तरुणाला ट्रकच्या खालून काढायला लावले. त्याच्या पायाला गंभीर जखम झाली होती. तिथे रुग्णवाहिका बोलाविण्यात आली आणि त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिकेत पाठवून मुख्यमंत्री स्वतः रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी त्या तरुणाला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. तरुणाला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था केली तसेच इतर जखमी रुग्णांना तेथे आणण्याच्या सूचना केली. 

मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९: ३० वाजताच्या वाजताच्या सुमारास अमरावती येथून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसक्रमांक एम.एच.४०-वाय ५५८१ ला गोंडखैरी येथील ब्रेकरजवळ ट्रक क्रमांक सी.जी.०४-एल.एफ.४०४६ च्या चालकाने मागून धडक दिली. त्यावेळी रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार गिरीश तिडके (माेटारसायकल क्रमांक एम.एच.४०-ए.जे-२६२०) ट्रकची धडक बसली. तो मोटारसायकलसह ट्रकच्या बोनेटमध्ये अडकला होता. यानंतर ट्रकने कारलाही कट मारल्याने यात बसलेले पंकज महादेव आगलावे यांच्यासह त्यांचे वडील,आई व पत्नी किरकोळ जखमी झाले होते. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थनगर, वाडी), रंजना शिशुपाल रामटेके (रा.रामबाग, मेडिकल), शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा.मौदा) यांच्यासह इतर प्रवाशांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAccidentअपघात