शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला भरधाव ट्रकची धडक; आईसमोर एकुलत्या एक मुलीचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: May 18, 2023 16:58 IST

तुकडोजी पुतळ्याजवळ एका भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर जाणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या जन्मदात्या आईसमोरच तिचा मृत्यू झाला.

योगेश पांडे 

नागपूर : तुकडोजी पुतळ्याजवळ एका भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवर जाणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या जन्मदात्या आईसमोरच तिचा मृत्यू झाला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

अश्लेषा सुनिल ठेंबरे (२०, चंद्रमणी नगर, अजनी) असे मृतक मुलीचे नाव आहे. अश्लेषा ही आपल्या दुचाकीवरून आई वर्षा (४७) हिला घेऊन जात होती. त्यावेळी एमएच ३६ एफ ०२५३ हा दहा चाकी ट्रक वेगात आला. ट्रकचालकाचे नियंत्रण राहिले नाही व त्याने दुचाकीला धडक दिली. यात अश्लेषा व तिची आई दोघेही खाली फेकल्या गेल्या. अश्लेषाच्या डोक्यावर मार बसल्याने ती जागेवरच बेशुद्ध पडली तर वर्षा यांच्या पायावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला व आरोपी ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. लोकांनी व पोलिसांनी दोघांना मेडिकलमध्ये नेले. मात्र अश्लेषाचा मृत्यू झाला होता.

तिच्या आईवर उपचार सुरू आहेत. तिचे वडील हिंगणा मार्गावरील एका वाहतूक कंपनीत काम करतात. अश्लेषा ही त्यांची एकुलती एक मुलगी होती व मुलगी शिकून मोठी होईल अशी स्वप्ने ठेंबरे दांपत्य पाहत असताना क्षणात होत्याचे नव्हते झाले. पोलिसांनी तिच्या वडीलांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू