ॲप डाऊनलोड केले आणि महिलेचे १.१० लाख गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 21:31 IST2022-02-12T21:31:32+5:302022-02-12T21:31:57+5:30
Nagpur News ब्लॉक झालेले एटीएम सुरू करण्यासाठी दोन ॲप डाऊनलोड करायला लावून सायबर गुन्हेगाराने एका महिलेच्या खात्यातून १.१० लाख रुपये उडविल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ॲप डाऊनलोड केले आणि महिलेचे १.१० लाख गेले
नागपूर : ब्लॉक झालेले एटीएम सुरू करण्यासाठी दोन ॲप डाऊनलोड करायला लावून सायबर गुन्हेगाराने एका महिलेच्या खात्यातून १.१० लाख रुपये उडविल्याची घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
रजनी गणपत तुमाने (४०, रा. हनुमान हाऊसिंग सोसायटी, मेहंदीबाग) या कमाल चौक येथे एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. तेथे त्यांचे एटीएम ब्लॉक केल्याचे मशीनमध्ये दाखवत होते. त्यामुळे त्यांनी गुगलवर सर्च करून कस्टमर केअरचा नंबर मिळविला. त्या क्रमांकावर फोन केला असता आरोपीने एनी डेस्क व एसएमएस फोन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपीने सांगितल्यानुसार त्यांनी दोन्ही ॲप डाऊनलोड केले. आरोपीने फिर्यादीकडून पिन मिळवून त्यांच्या बँक खात्यातून १.१० लाख रुपये वळते केले. रजनी यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
..........