शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

प्रेमसंबंध उघडकीस आले, सळाखीने वार करून पत्नीला संपविले

By दयानंद पाईकराव | Updated: June 26, 2024 18:14 IST

प्रेम विवाहाचा करुण अंत : आरोपीस अटक, दोन वर्षांचा चिमुकला झाला पोरका

नागपूर : पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीवर सळाखीने वार करून तिला संपविल्याची घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी २५ जूनला रात्री ८.३५ ते ९.१० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे आरोपी आणि मृतक महिलेचा दोन वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.

मन्नत उर्फ मिनू दिलप्रित कौर विर्क (२४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलप्रित उर्फ विक्की कुलविंदरसिंग विर्क (३०, रा. पंचमवेद्य आर्य सोसायटी, दिक्षीतनगरजवळ, कपिलनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघांचाही २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता. त्यांना एक २ वर्षांचा मुलगाही आहे. आरोपी दिलप्रितचे चारचाकी वाहनांच्या अ‍ॅसेसरीज व स्पेअर पार्टचे दुकान आहे. मन्नतचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. काही दिवसांपूर्वी दिलप्रितला सदर परिसरात मन्नत एका युवकासोबत फिरताना आढळली. त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी (२०, रा. हुडको कॉलनी जरीपटका) याला फोन करून मन्नतसोबत घटस्फोट घ्यायचा असून त्याबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपी दिलप्रितचा मन्नतसोबत मंगळवारी रात्री तिच्या प्रेमसंबंधावरून पुन्हा वाद झाला.

रागाच्या भरात दिलप्रितने लोखंडी सळाखीने मन्नतच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. त्यानंतर आरोपी दिलप्रित घराला कुलुप लाऊन निघून गेला. इकडे मन्नतचा भाऊ आणि तिच्या मेत्रीणीने मन्नतशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना शंका आली. त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नतच्या घराचे दार तोडून आत बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मन्नतचा भाऊ विशालने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रितविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

घटनेच्या वेळी चिमुकला होता आजीकडेमन्नत आणि आरोपी दिलप्रितला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. परंतु घटनेच्या वेळी हा चिमुकला आरोपी दिलप्रितच्या आईकडे होता. आईचा खून झाला आणि वडिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हा चिमुकला पोरका झाला आहे.

पोलिसांचा हलगर्जीपणा भोवलाघटनेपूर्वी अनेकदा मन्नत आणि दिलप्रित यांचा वाद कपिलनगर आणि जरीपटका पोलिस ठाण्यात गेला होता. दोघांनीही ऐकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. एवढेच काय तर घटनेच्या एक दिवस आधी मन्नत आणि तिचा भाऊ विशाल हे कपिलनगर ठाण्यात गेले होते. तेथे त्यांनी दिलप्रितपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. परंतु अनेकदा वादाच्या तक्रारी होऊनही जरीपटका व कपिलनगर पोलिसांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली नाही आणि मन्नतला आपल्या जीवाला मुकावे लागले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर