शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी थांबवून मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीला २४ तासात बेड्या

By दयानंद पाईकराव | Updated: May 11, 2024 20:15 IST

आरोपीसोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे.

नागपूर : मित्राच्या मुलाचे लग्न आटोपून घरी परत येणाऱ्या व्यक्तीला अडवून त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी २४ तासात गजाआड केले आहे. आरोपीसोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा यात समावेश आहे.

अमित मनोज पाटील (१९, रा. प्लॉट नं. १९४, जयहिंदनगर, संजुबा शाळेमागे, हुडकेश्वर) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश पंढरीनाथ सुहागपुरे (५३, रा. स्वागतनगर, न्यु नरसाळा) हे आपल्या मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी उमरेड रोडवरील कान्हा सेलिब्रेशनमध्ये गेले होते. लग्न आटोपून ते दुचाकीने आपल्या घरी परत येत होता. उमरेड रोडवर बहादुरा फाटाजवळ आरोपी अमित आणि त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकाने महेश यांना थांबविले. दोघांनी त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी महेश यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रीक तपास करीत आरोपी अमितला ताब्यात घेतले असता त्याने आपला साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMobileमोबाइल