शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२६% टेरिफचा वस्त्रोद्योगाला बसणार सर्वाधिक फटका ! देशातील रोजगार निर्मितीवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:08 IST

Nagpur : दर वाढल्यास मागणी कमी होऊन निर्यात मंदावण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर सरासरी २६ टक्के टेरिफ लावला आहे. याचा सर्वाधिक फटका भारतीय वस्त्रोद्योगाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेत भारतीय कापडाचे दर वाढण्याची आणि त्यातून मागणी कमी होऊन निर्यात मंदावण्याची शक्यता नाकारता येत आहे. याचा परिणाम देशातील रोजगार निर्मितीवर होऊ शकतो.

भारतात सर्वाधिक रोजगार जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, टेक्सटाइल व गारमेंट इंडस्ट्रीजची साखळी देते. भारतातून अमेरिकेत दरवर्षी सरासरी ९.६ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्त्र आणि पोशाखाची निर्यात केली जाते. अमेरिकेने डिस्काउंटेड रेसिप्रोकल टेरिफ लावला असला तरी भारतातून अमेरिकेत निर्यात होणारे वस्त्र व पोशाख सुटण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारत अमेरिकन वस्तूंवर सरासरी ३९ टक्के तर अमेरिका भारतीय वस्तूंवर पाच टक्के टेरिफ लावत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रॅम यांनी केला आहे. 

अमेरिकेत दर्जा व किमतीमुळे बांगलादेशच्या कापडाला भरीव मागणी आहे. मात्र, बांगलादेशातील अराजकतेमुळे ही संधी भारताकडे चालून आली होती. या टेरिफमुळे तीदेखील मावळल्यागत झाली आहे. टेरिफमुळे भारतीय कापड व पोशाखाचे अमेरिकेत दर वाढल्यास मागणी कमी हाईल. त्यातून किमान १ ते २ अब्ज डॉलर किमतीच्या कापडाची निर्यात कमी होऊन हा कापड देशांतर्गत बाजारात राहिल्यास कापड उद्योगाला नुकसान होण्याची व त्यातून या उद्योगावर रोजगार कपात करण्याची वेळ ओढवण्याची शक्यता जाणकार व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

बांगलादेश व व्हिएतनामची स्पर्धा कमीअलीकडच्या काळात व्हिएतनामच्या वस्त्रोद्योगाने उचल घेतली आहे. त्यांच्या चलनाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत खूपच कमी असले तरी त्यांच्या वस्त्र व पोशाख निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर ४६ टक्के तर बांगलादेश ३७ टक्के टेरिफ लावला आहे. या दोन्ही देशांच्या तुलनेत भारतावरील टेरिफ कमी वाटत असला तरी देशाच्या आर्थिक प्रगती व रोजगार निर्मितीचा वेग विचारात घेता हा टेरिफ अधिक आहे. या दोन्ही देशांच्या वस्त्र व पोशाख निर्यातीवर परिणाम होणार असून, केंद्र सरकारने भारताचे स्थान पक्के करण्यासाठी व्यवस्थित नियोजन करून मार्ग काढणे गरजेचे आहे.

टॅग्स :nagpurनागपूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTaxकर