शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणनेसाठी १९४८च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:43 IST

Nagpur : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. तायवाडे यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली असली तरी त्यासाठी आधी १९४८ च्या कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. तायवाडे म्हणाले, अनेक वर्षापासून या देशातील ओबीसी समाजाकडून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली जात होती. सामाजिक संघटनांची मागणी राजकीय पक्षांनी आपल्या अजेंड्यावर घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा, राज्यसभेसह वेगवेगळ्या व्यासपीठांवर ही मागणी केली. याला प्रतिसाद देत केंद्र सरकारने मंत्रिमंडळात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सर्वच स्तरावरून केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले. केंद्र सरकारने २०२५ची अधिसूचना काढली व त्यात २०२७मध्ये जातनिहाय जनगनना पूर्ण होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, जातनिहाय जनगणनेला सुरुवात होण्यापूर्वी केंद्र सरकारला १९४८च्या जनगणना कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. 

जागानिहाय जनगणना करण्यात येईल, असा उल्लेख त्यात करावा लागेल. यासाठी लोकसभा व राज्यसभेत तसा कायदा मंजूर करून घ्यावा लागेल. या दोन्ही सभागृहात हे दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त करीत जातनिहाय जनगणना होण्याबाबत आपल्या मनात कुठलीही शंका नसल्याचे डॉ. तायवाडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूर