ते धन काळेच

By Admin | Updated: November 15, 2016 02:25 IST2016-11-15T02:25:51+5:302016-11-15T02:25:51+5:30

अंबाझरी पोलिसांनी रविवारी रामनगरातील एका सदनिकेतून जप्त केलेली रक्कम ‘काळे धन’च असल्याचे

That's the time | ते धन काळेच

ते धन काळेच

हिलटॉपमधील पावणेदोन कोटींची रोकड : प्राप्तीकर विभागाच्या हवाली
नागपूर : अंबाझरी पोलिसांनी रविवारी रामनगरातील एका सदनिकेतून जप्त केलेली रक्कम ‘काळे धन’च असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या रकमेसह ताब्यात घेतलेल्या चौघांना प्राप्तीकर विभागाच्या हवाली केले आहे. आता या प्रकरणाची चौकशी प्राप्तीकर खात्याचे अधिकारी करणार आहेत.
रामनगर हिलटॉपमधील अ‍ॅडव्होकेट सोसायटीच्या सदनिकेत कोट्यवधींची रोकड असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांना रविवारी कळली होती. त्याआधारे अंबाझरीचे द्वितीय निरीक्षक सतीश गोराडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे छापा घातला. सी-१६ क्रमांकाच्या सदनिकेत चार तरुण आढळले. त्यांच्याजवळ एक प्रवासी बॅग होती. बॅगमध्ये १००० आणि ५०० च्या नोटांची अनेक बंडले होती. या रकमेबाबत तरुणांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे ही १ कोटी ८७ लाख ५० हजाराची रोकड आणि त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दीपक सत्यनारायण अग्रवाल(वय ४५, रा. टेलिफोन एक्स्चेंज चौक), अरविंद अंबादास गवई (वय ४२, रा. संगम टॉकीजजवळ), अनिकेत मोहनदास कुमरे (वय २१, रा. कमाल चौकाजवळ, पाचपावली) आणि मयंकुमार मूलचंद शिवहरे (वय २४, रा. छावनी बांदा उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. रात्रभर या सर्वांची चौकशी केल्यानंतर या रकमेचा कोणत्या गुन्हेगार किंवा गुन्ह्याशी संबंध नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अर्थात ही रोकड ‘काळे धन’च असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी रोकड अन् चौघांना प्राप्तीकर खात्याच्या हवाली केले.(प्रतिनिधी)

सीए आणि बिल्डर कनेक्शन
४विशेष म्हणजे, पोलिसांनी या संदर्भात अनेक बाबींचा उलगडा करण्याचे टाळले असले तरी शहरात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणातील अग्रवाल हे चाटर्ड अकाउंटंट (सीए) आहे. दुसरा अरविंद गवई शहरातील एका बड्या बिल्डरकडे व्यवस्थापक आहे. मयंककुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून तो अ‍ॅडव्होकेट सोसायटीत (जेथे रोकड पकडली) राहतो. या बाबी पुढे आल्यामुळे सीए आणि बिल्डर कनेक्शनही चर्चेला आले आहे.

Web Title: That's the time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.