शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

थँक्यू नागपूर पोलीस ! ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:08 AM

मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले. निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.

ठळक मुद्देकोणतीही अप्रिय घटना नाही : शांततेत आणि उत्साहात मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदान शांततेत पार पाडण्यासाठी खास व्यूहरचना करून गेल्या ७२ तासांपासून अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या पोलिसांमुळे नागपुरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही. नागपूरकरांनी अत्यंत शांततेत आणि उत्साहात मतदान केले.निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला होता. देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघातील लढतीवर देशाचे लक्ष लागले होते. त्यामुळे येथील पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण होता. परिणामी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मतदानाच्या दोन दिवसांपूर्वीपासूनच बंदोबस्ताची व्यूहरचना केली होती. स्थानिक पोलीसांच्या मदतीला होमगार्डस्, केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेतले होते.या सर्वांच्या मदतीने गेल्या ७२ तासांपासून पोलीस यंत्रणा रात्रंदिवस बंदोबस्तात गुंतली होती. गुंड तसेच अवैध दारू विक्री करणारे आणि धामधूम करणारे उपद्रवी समाजकंटक यांच्यावर कारवाईचा धडाका लावला होता. शहरातील सर्व संवेदशनशील वस्त्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संवेदनशील, अतिसंवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. विनाकारण वाद घालून शांतता भंग करण्याची सवय जडलेल्या गुन्हेगारांंना पोलिसांनी आधीच सज्जड दम दिला होता. त्यामुळे समाजकंटकांनी शांत बसण्यातच धन्यता मानली.गुरुवारी रखरखत्या उन्हात सीपी (पोलीस आयुक्त) टू पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) असे सर्वच जण बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळताना धावपळ करताना दिसत होते. कुठे काही गडबड गोंधळ झाला तर त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शीघ्र कृती दलाचे पथक ५ ते १० मिनिटात पोहचेल, अशी बंदोबस्ताची व्यूहरचना करण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही गडबड गोंधळ शहरातील कोणत्याच भागात झाला नाही.मोमीनपुरा, ताजबाग, हसनबाग, ताजनगर, टेका नाका, सतरंजीपुरा आणि ठिकठिकाणच्या मुस्लीमबहुल मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. रखरखत्या उन्हात या भागात जागोजागी पोलीस रस्त्यावर दिसत होते. त्यात पोलीस आयुक्त, सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्तांचाही समावेश होता. गस्तीवरील वाहनेही दर पाच मिनिटांनी इकडून तिकडून फिरताना दिसत होती.दुपारच्या वेळी उत्तर नागपुरातील एका मतदान केंद्राजवळ मतदार यादीमुळे गोंधळ झाल्याचे कळताच स्वत: पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोहचले. मतदान संपल्यानंतर सर्व मतदार केंद्रातील ईव्हीएम मशीन्स कळमन्यातील स्ट्राँग रूममध्ये पोहचवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पोलिसांची धावपळ सुरू होती. पोलिसांनी घेतलेल्या अविश्रांत परिश्रमामुळे आणि त्यांनी केलेल्या चोख बंदोबस्तामुळेच शहरात कुठेही अप्रिय घटना घडली नाही.नागपूरकरांनो धन्यवाद !  पोलीस आयुक्त डॉ. उपाध्यायनागपूरकर जनतेने पोलिसांना केलेल्या सहकार्यामुळेच शहरात अत्यंत चांगल्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. कुठेही, कसलीच अनुचित घटना घडली नाही. यासाठी नागपूरकर जनतेला आपण मनापासून धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिली.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019