शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

ठाकरे-मुत्तेमवार भाजपाचीच ‘बी टीम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 8:56 PM

शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

ठळक मुद्देगेव्ह आवारींनी केली काँग्रेस अध्यक्षांकडे तक्रारदोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा आरोप‘लेटरबॉम्ब’मुळे पक्षातील वाद आणखी वाढणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आणखी पेटला असून यासंबंधातील तक्रारी थेट ‘हायकमांड’पर्यंत गेल्या आहेत. माजी खासदार गेव्ह आवारी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते पक्षविरोधी कारवाया करीत आहेत. ठाकरे व मुत्तेमवार हे काँग्रेसमध्ये राहून भाजपची ‘बी टीम’ म्हणून काम करीत असल्याचा आरोप लावत आवारी यांनी दोघांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी पत्राच्या माध्यमातून केली आहे.२०१४ पर्यंत नागपुरातून ‘सेक्यूलर’ उमेदवारच निवडून यायचे. मात्र विलास मुत्तेमवार हे नागपूरचे खासदार झाले आणि नंतर हे चित्र बदलले. ते अनेकवेळा निवडून आले, मात्र पक्षविरोधी कारवायादेखील सुरूच होत्या. यामुळेच २०१४ च्या निवडणुकांमध्ये ते २ लाख ८३ हजार मतांनी हरले. शहराध्यक्षांसोबत संगनमत करून त्यांनी कॉंग्रेस पक्षाशी निष्ठा राखणाºया आणि पात्र सदस्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. पक्षात जवळच्या व्यक्तींना स्थान दिले. यामुळे मनपाच्या निवडणुकांत २००७ पासून २०१७ या कालावधीत सातत्याने तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. २०१७ मध्ये तर मुत्तेमवार-ठाकरे यांच्या जोडीने अनेक सक्षम नगरसेवकांना तिकिटे नाकारत आपल्या वतीने ‘एबी फॉर्म्स’चे वाटप केले. याचा फटका दारुण पराभवाच्या रूपात बसला. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर शहरात भाजपाचे एकहाती वर्चस्व आहे, असे गेव्ह आवारी यांनी पत्रात लिहिले आहे.मुत्तेमवार यांच्यामुळेच विधान परिषदेच्या जागेवर भाजपाला बिनविरोध विजय मिळविता आला. २०१७ च्या मनपा निवडणुकांनंतर मुत्तेमवार व ठाकरे यांनी आपल्या मर्जीतील व्यक्तीला मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदावर बसविले. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी कायद्यानुसार जात आपला नेता निवडला. परंतु याविरोधात मुत्तेमवारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दोघांनीही पक्षविरोधी कारवायांचा कळसच गाठला आहे. यामुळे जनता व काँग्रेस सदस्यांमध्ये रोषाचे वातावरण आहे. पक्षाच्या अंतर्गत निवडणुका रद्द व्हाव्या यासाठीदेखील त्यांनी प्रयत्न केले. काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी ही वेदनादायी बाब असून या दोघांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेव्ह आवारी यांनी केली. महाराष्ट्र राज्यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीचा अध्यक्ष या नात्याने मी काय पावले उचलावी, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंतीदेखील त्यांनी राहुल गांधी यांना पत्रातून केली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर