शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक

By योगेश पांडे | Updated: April 21, 2025 15:21 IST

रामदास आठवले यांची भूमिका : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी तुटेल

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेडकरी ऐक्याची भूमिका मांडली आहे. ठाकरे एकत्र येतील तेव्हा येतील, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरी पक्षांचे ऐक्य आवश्यक आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन आठवले यांनी केले आहे. सोमवारी त्यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट देत संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करत विविध विषयांवर मत मांडले.

देशात केवळ दोनच पक्ष असावेत अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मात्र आंबेडकरी पक्ष जास्त काळ एकत्रित राहू शकले नाहीत. आरपीआयमध्येदेखील फूट पडली व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता आंबेडकरी ऐक्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारले तर सर्व आंबेडकरी पक्ष एकत्रित येऊ शकतात. माझा त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. मात्र आंबेडकरांकडून अद्याप हवी तशी साथ मिळालेली नाही. स्वबळावरच लढण्याची त्यांची भूमिका आहे. त्यांनी खरे तर बाबासाहेबांच्या विचारातून समोर आलेला पक्षच चालविला पाहिजे, असे आठवले म्हणाले.

तर महाविकासआघाडीतून उद्धव दूर होतीलउद्धव ठाकरेराज ठाकरे सोबत यावे अशी माझीदेखील इच्छा आहे. ते सोबत आले तर महाविकास आघाडीत निश्चित फूट पडेल. महाविकासआघाडी कधीही राज ठाकरे यांना सोबत घेणार नाही. त्याचा फटका मविआला बसेल. मात्र कुणीही एकत्रित आले तरी महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

बौद्धगयेसाठी पंतप्रधानांना भेटणारबौद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट १९४९ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी व्यापक आंदोलन सुरू आहे. याचा तोडगा निघावा यासाठी माझा प्रयत्न सुरू असून मी पंतप्रधानांना भेटणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

आम्हाला मतदारसंघच तयार करता आले नाहीतमी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते व मलादेखील त्यामुळे सत्तेत राहता येते. माझा स्वभाव ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नसल्यामुळे अनेकदा हक्काच्या गोष्टीदेखील आम्ही मिळवू शकत नाही. राजकीयदृष्ट्या पक्षाला हवी तशी मजबूती मिळाली नाही, कारण मतांच्या राजकारणात प्रभाव दाखवू शकलेलो नाही. पक्षासाठी समर्पित कार्यकर्ते असले तरी आम्हाला तगडे मतदारसंघ तयार करता आले नाही अशी खंत यावेळी आठवले यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर