पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके
By Admin | Updated: June 17, 2014 00:52 IST2014-06-17T00:52:10+5:302014-06-17T00:52:10+5:30
जिह्यातील शाळा २६ जूनला सुरू होत आहे. शासकीय व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण

पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके
जिल्हा परिषद : तालुका स्तरावर पुस्तके पोहचली
नागपूर : जिह्यातील शाळा २६ जूनला सुरू होत आहे. शासकीय व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जाणार आहे. या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर पाठ्यपुस्तकासाठी विद्यार्र्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. नियोजन करूनही वेळेवर पुस्तके मिळत नाही. याचा अभ्यासावर परिणाम होतो. ही बाब विचारात घेता यावेळी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच तालुका स्तरावर पुस्तके उपलब्ध केली आहेत. मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वाटप सुरू असल्याची माहिती जि.प.च्या शिक्षण सभापती वंदना पाल यांनी दिली.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील ३,९८,३९८ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. यासाठी २४,५३,४४३ पुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडे केली होती. यातील २२,८७,६५४ पुस्तके प्राप्त झाली आहेत तर १,६५७८९ पुस्तके शिल्लक आहेत. शासनाच्या धोरणानुसार शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध केली जातात.
जिल्ह्यातील कोणताही विद्यार्थी यापासून वंचित राहू नये, असे निर्देश शिक्षण विभागाला दिल्याची माहिती पाल यांनी दिली.
जि.प.च्या शिक्षण विभागाच्या मागणीनुसार ८५५२१४ स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत. पाठ्यपुस्तकासोबतच याचेही वाटप केले जाणार आहे. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना मोफत गणवेश उपलब्ध करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार विभागाने नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)