कॅफेंवर ओळखपत्राच्या नियमांकडे पाठ

By Admin | Updated: May 20, 2014 00:57 IST2014-05-20T00:57:47+5:302014-05-20T00:57:47+5:30

शहरातील अनेक इंटरनेट कॅफेवर ओळखपत्राच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही कॅफेंवर ओळखपत्राची विचारणा केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी ओळखपत्राचे

Text to Café's Identity Card rules | कॅफेंवर ओळखपत्राच्या नियमांकडे पाठ

कॅफेंवर ओळखपत्राच्या नियमांकडे पाठ

नागपूर : शहरातील अनेक इंटरनेट कॅफेवर ओळखपत्राच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही कॅफेंवर ओळखपत्राची विचारणा केली जाते. मात्र, अनेक ठिकाणी ओळखपत्राचे स्कॅनिंग करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कॅफेच्या माध्यमातून अनेक गुन्हे होतात. पोलिसांतर्फे सुरक्षेच्या बाबतीत कॅफेचालकांना सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र अनेक कॅफेचालकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत मनमानी कारभार सुरूच ठेवला आहे. गेल्या काही वर्षात लॉटरी लागल्याचे आमिष दाखविणारे मेल येणे, अश्लील मेल पाठविणे, आॅनलाईन पद्धतीने बँकेतील पैसे वळविणे आदी गुन्हे संगणकाच्या माध्यमातून होऊ लागल्याचे समोर आले आहे. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी इंटरनेटचा वापर होत असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे इंटरनेट कॅफेचालकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे अनेक कॅफेचालक दुर्लक्ष करीत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून होणार्‍या गुन्ह्यांमध्ये वाढ होत गेल्याने आणि दहशतवादी कृत्यांसाठी इंटरनेटचा वापर वाढल्याने पोलिसांचे याकडे अधिक लक्ष आहे. त्यासाठी खास सायबर गुन्हे शाखा सुरू करण्यात आली आहे. शहरातील कॅफेचालकांनी परवानगी घेऊनच कॅफे सुरू करण्याची गरज आहे. मात्र त्याकडेही अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. कॅफेवर येणार्‍या अनोळखी व्यक्तीस इंटरनेटवर बसू देण्यापूर्वी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी करणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे अनेक जण दुर्लक्ष करीत आहेत. काही ठिकाणी ओळखपत्र मागितले जाते. परंतु त्याचे स्कॅनिंग न करताच बसू देण्यात येते. सायबर गुन्हे शाखेतर्फे शहरातील कॅफेचालकांना व्यक्तीची ओळख, त्याची सर्व माहिती ठेवणारे सॉफ्टवेअर ठेवण्याची सूचना केली जाते. या सॉफ्टवेअरमध्ये व्यक्तीच्या ओळखपत्राची, व्यक्तीची माहिती भरली जाते. मात्र हे सॉफ्टवेअर ठेवण्याकडे अनेक कॅफेचालक दुर्लक्ष करीत आहेत. पोलिसांतर्फे कॅफेत येणार्‍या व्यक्तीची माहिती ठेवणारे सॉफ्टवेअर कॅफेचालकांनी ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. बहुतांश कॅफेचालकांनी त्याचा वापर सुरू केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Text to Café's Identity Card rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.