हनुमान झोनमधील चाचणी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:46+5:302021-04-04T04:08:46+5:30
नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी : नागरिकांची गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हनुमाननगर झोन कार्यालयात मागील काही महिन्यांपासून ...

हनुमान झोनमधील चाचणी केंद्र बंद
नगरसेवकांनी व्यक्त केली नाराजी : नागरिकांची गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगर झोन कार्यालयात मागील काही महिन्यांपासून कोविड चाचणी केंद्र सुरू होते. यामुळे परिसरातील नागरिकांना सुविधा झाली होती. झोन कार्यालयाचा परिसर मोठा असल्याने दैनंदिन कामकाजावर याचा कोणताही परिणाम झाला नव्हता; परंतु शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी हे केंद्र अचानक बंद करण्यात आले. यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोविड चाचणी केंद्रामुळे नागरिकांची गैरसोय होणार असल्याने केंद्र बंद करून मनपा प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल नगरसेवक सतीश होले यांनी केला आहे. कोणत्याही प्रकारची सूचना न देता अचानक केंद्र बंद ठेवल्याने तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. विशेष म्हणजे झोन कार्यालयाचा परिसर मोठा आहे. चाचणी केंद्र एका बाजूला होते. तपाण्यासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी आवश्यक जागा असल्याने संसर्गाचा धोकाही नाही. असे असतानाही केंद्र बंद करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.