आतंकवादी, नक्षलवादी कारवाईचा सामना करणार- अहीर
By Admin | Updated: June 1, 2017 18:17 IST2017-06-01T18:17:10+5:302017-06-01T18:17:10+5:30
शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी केंद्र शासन आहे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

आतंकवादी, नक्षलवादी कारवाईचा सामना करणार- अहीर
आॅनलाईन लोकमत
पुलगाव (वर्धा) : शहिदांच्या समस्या सोडवण्याचा राज्य व केंद्र शासन सातत्याने प्रयत्न करणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात आतंकवादी व नक्षलवादी कारवाईचा सामना शासन करणार आहे. शहीद कुटुंबीयांच्या पाठीशी केंद्र शासन आहे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
देशाच्या रक्षणार्थ सीमेवर लढणाऱ्या शहिदांचा आदर सर्वांनीच केला पाहिजे. शहीद कृतज्ञता सोहळ्यात येताना शहीद कुटुंबीयांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचा सन्मान करताना, शहीद कुटुंबीयांचा गौरव करताना त्यांच्या त्यागाला, त्यांच्या शहीद सुपुत्रांना मानाचा मुजरा करतो. कर्ता पुरूष घरातून गेल्यावर कुटुंबाचा भार वडीलधाऱ्या मंडळीवर वा वीर पत्नीवर असतो, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील विविध संस्था, संघटनांच्या सहकार्याने स्थानिक रंगलाल केजडीवाल हायस्कूलच्या स्मृती मंचावर शहीद दिन कार्यक्रम समितीच्यावतीने शहिदांच्या कुटुुंबीयांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्र शासनाकडून काही घोषणा केल्या जातील, अशी अपेक्षा होती; पण कुठलीही घोषणा करण्यात आली नाही.