शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची दहशतवाद्याची धमकी

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 29, 2024 14:47 IST

विमानतळ व्यवस्थापनाला मिळाला मेल : विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर, सुरक्षेच्या उपाययोजना

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली असून धमकीमध्ये दहशतवाद्याने विमाने स्फोटकाने उडवून देण्याचा इशारा दिला आहे. ही धमकी सोमवारी सकाळी ९.४५ वाजता विमानतळ व्यवस्थापनाला इ-मेलद्वारे देण्यात आली. धमकीचा मेल आल्यानंतर विमानतळ प्रशासनात घबराट पसरली असून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि स्थानिक पोलिसांनी विमानतळावर तातडीने शोधमोहीम सुरू केली. पण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी देशातील अनेक विमानतळांवर धमकीचे मेल आल्याचे विमानतळ प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितले. जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ व्यवस्थापनालाही असे मेल पाठवल्याची माहिती आहे. या मेलमध्ये सर्व विमानतळांवर बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे.

मेलद्वारे मिळालेल्या धमकीची माहिती प्रारंभी विमानतळाची सुरक्षा करणारे सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आली. सुरक्षेच्या तातडीने उपाययोजना करीत विमानतळाची शोधमोहिम हाती घेतली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकासह इतर सुरक्षा यंत्रणांनी विमानतळाची तपासणी केली. सध्या विमानतळावर कडक सुरक्षा असून प्रवाशांना तपासणीनंतरच आत सोडण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळावर पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात केली आहेत. परिसरातील घडामोडींवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. संशयितांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

धमकीचा मेल मिळाला, विमानतळाची तपासणी

धमकीचा मेल सकाळी ९.४५ वाजता मिळाला. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी आणि सीआयएसएफ व स्थानिक पोलिसांना देण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने विमानतळाची तपासणी केली. त्यात संशयास्पद असे काहीही आढळले नाही. सुरक्षा यंत्रणांची विमानतळावर बारीक नजर असून सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.आबिद रूही, वरिष्ठ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद