शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

दहावीच्या अभ्यासक्रमाला प्रशिक्षणार्थी शिक्षक मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:27 PM

दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल्या आहेत. या प्रशिक्षणातून जे तज्ज्ञ प्रशिक्षक होणार आहेत, त्यांना तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. परंतु शिक्षकच उपलब्ध होत नसतील, तर विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, असाही आरोप संघटनांनी केला आहे.

ठळक मुद्देवयाच्या अटीमुळे परिणाम : शिक्षक संघटनांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल्या आहेत. या प्रशिक्षणातून जे तज्ज्ञ प्रशिक्षक होणार आहेत, त्यांना तालुक्यातील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. परंतु शिक्षकच उपलब्ध होत नसतील, तर विद्यार्थ्यांना कसे शिकविणार, असाही आरोप संघटनांनी केला आहे.२०१८-१९ या शैक्षणिक सत्रापासून दहावीचा अभ्यासक्रम बदलत आहे. दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे शिक्षकांसाठी प्रशिक्षण राज्यभरात सुरू आहे. या प्रशिक्षणातून तालुकास्तरीय तज्ञ प्रशिक्षकाच्या निवडीसाठी २ एप्रिलपर्यंत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात ४५ वर्षाखालील शिक्षक व १० वर्षाचा अध्यापनाचा अनुभव अशा अटी लादल्या होत्या. त्यामुळे आॅनलाईन शिक्षकांचे अर्ज फारच कमी आहे. शिवाय एका विषयाला एकच दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने, एका दिवसात नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक ओळख, घटक आशय ओळख, मूल्यमापन योजना आदीबाबत सखोल मार्गदर्शन शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. नागपूर विभागातील शिक्षकांचे गुरुवार, ५ एप्रिलपासून १७ एप्रिलपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. बोर्ड आॅफ स्टडीजचे सदस्य शिक्षकांना हे प्रशिक्षण देत आहे.ना शिक्षक प्रशिक्षित होईल, ना विद्यार्थीमहाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने प्रशिक्षकाच्या निवडीसाठी ४५ वर्षाखालील शिक्षकाची अट लादली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून प्रतिसाद अत्यल्प आहे. पुस्तकाची निर्मिती करताना वयाची अट नाही, तर तज्ञ प्रशिक्षकाची निवड करताना वयाची अट का?, शिवाय नवीन अभ्यासक्रम एका दिवसाच्या प्रशिक्षणावर शक्य नाही. या अटीमुळे ना शिक्षक प्रशिक्षित होणार आहे, नाही विद्यार्थी.पुरुषोत्तम पंचभाई, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ- प्रशिक्षण सुरळीत सुरू आहेविदर्भातील सहा जिल्ह्याचे प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था येथे सुरू आहे. आॅनलाईन अर्ज मागविण्यात आल्यामुळे शिक्षकांच्या संख्येवर परिणाम होणार होता, त्यामुळे शिक्षकांच्या उपलब्धतेची जबाबदारी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकाऱ्याला देण्यात आली होती. आम्हाला विभागातून २१० शिक्षकांची अपेक्षा होती, तरीही १८४ शिक्षक प्रशिक्षणाला आले होते. ४५ वर्षाखालील शिक्षकांची अट असली तरी, आम्ही ४५ वर्षावरील शिक्षकांनाही सामावून घेतले आहे. प्रशिक्षणासाठी बालभारतीकडून पुस्तकेही उपलब्ध करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान त्यांना कुठल्याही अडचणी येणार नाही, याची काळजी संस्थेने घेतली असल्याची माहिती समन्वयक विजय चौधरी यांनी दिली.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा