शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध

By योगेश पांडे | Updated: May 2, 2025 22:47 IST

सहा तासांच्या आत दोन बहिणींना शोधण्यात पोलिसांना यश

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: एरवी दहावी-बारावी किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या निकालातून विद्यार्थी तणावात आल्याचे दिसून येतात. मात्र वाढत्या स्पर्धेत चक्क सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’ घेत एक १२ वर्षीय मुलगी घर सोडून निघून गेली. जाताना सोबत तिने चार वर्षांच्या बहिणीलादेखील सोबत घेतले होते. मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सहा तासांच्या आत त्यांना शोधण्यात यश आले. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. मात्र काही अनुचित व्हायच्या आत मुलींना पालकांच्या हवाली करण्यात आले. गुरुवारी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

१२ वर्षीय मुलीचे आईवडील दोघेही खाजगी नोकरी करतात व मध्यमवर्गीय कुटुंब आहे. तिचा शुक्रवारी सातव्या इयत्तेचा निकाल लागणार होता. यामुळे तिला तणाव आला होता. ती तिच्या ४ वर्ष वयाच्या बहिणीला घेऊन सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आजी आजोबांसोबत उद्यानात खेळायला जात आहे असे सांगून घरातून निघाली. मुली उशीरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला. अखेर पालकांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली. सोशल माध्यमांमध्ये तातडीने संपूर्ण माहिती शेअर करण्यात आली.

तसेच सीसीटीव्ही फुटेज युद्धपातळीवर तपासण्यात आले. मुली राधाकृष्ण गार्डन ईष्वर नगर, गुरूदेव नगर, तिरंगा चौक, गजानन चौक, हेडगेवार चौक, जनरल आवारी चौक या मार्गाने पायी जात असल्याचे फुजेटमध्ये दिसून आले. त्या रेल्वे स्थानकात असल्याची माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे हे पथकासह होम प्लॅटफॉर्मवर पोहोचले. तेथे त्यांना मुली सुखरूप आढळल्या. त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले व त्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील, राहुल शिरे, मुकुंद ठाकरे, पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, दिगंबर बोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

भिती वाटल्याने घराकडे परतल्याच नाही

सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत त्या नागपुरातील रस्त्यांवर चालत होत्या. मात्र आता इतक्या उशीरा घराकडे परत गेलो तर घरचे रागावतील अशी भिती वाटली. त्यामुळे मुलगी चिमुकल्या बहिणीला घेऊन रेल्वे स्थानकाच्या आत जाऊन बसली. पोलिसांनी तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसविल्याची बतावणी केली. मात्र त्यानंतर तिने सत्य सांगितले. ते ऐकून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्काच बसला.

टॅग्स :nagpurनागपूरStudentविद्यार्थीPoliceपोलिस