शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च एन्डिंगचे टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:31 PM

शासकीय कार्यालयांना ३१ मार्चपूर्वी विविध योजनांवरील खर्चाचा अहवाल, आलेल्या निधीचे समायोजन करावे लागते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शासनाने ५ टक्के कर्मचारी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आहे. मात्र मार्च एन्डिंगच्या टेन्शनमुळे कामे आटोपण्यासाठी ५० टक्केहून अधिक कर्मचारी शासकीय कार्यालयात दिसत आहे.

ठळक मुद्दे५० टक्के कर्मचारी दिसतात शासकीय कार्यालयात : मार्च एन्डिंगला मुदतवाढ देण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय कार्यालयांना ३१ मार्चपूर्वी विविध योजनांवरील खर्चाचा अहवाल, आलेल्या निधीचे समायोजन करावे लागते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शासनाने ५ टक्के कर्मचारी उपस्थित रहावे, असे निर्देश दिले आहे. मात्र मार्च एन्डिंगच्या टेन्शनमुळे कामे आटोपण्यासाठी ५० टक्केहून अधिक कर्मचारी शासकीय कार्यालयात दिसत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मार्चचा महिना महत्त्वाचा असतो. त्यातच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामूहिक आणि वैयक्तिक व लोकहिताच्या योजना राबविण्यात येत असतात. कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध वस्तूंची खरेदी, शासनाकडून आलेल्या अनुदानाचे वाटप, त्याचा ताळेबंद शासनाला सादर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रात्री उशिरापर्यंत कर्मचारी कार्यालयात कार्यरत असतात. यंदा कोरोनाच्या संक्रमणाचे सावट पसरले आहे. शासनाने ५० टक्केवरून ५ टक्क्यापर्यंत कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ५ टक्के कर्मचाऱ्यांवरच कामकाज चालवायचे आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील शासकीय अनुदान खर्च करण्यासाठीची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात ५० टक्केहून अधिक कर्मचारी मार्च एन्डिंगच्या कामात व्यस्त दिसतात. शिक्षण विभागात तर ५० टक्के कर्मचारी कार्यरत आहे. केंद्र शासनाने आर्थिक वर्षाची मुदत ३ महिने वाढविली. महाराष्ट्र सरकारने अजून यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव कार्यालयात काम करावे लागत आहे.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने मार्च एन्डिंगची मुदत किमान ३ महिने वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे शरद भांडारकर, महेश जोशी, संजय चामट, मनोज घोडके, नितीन किटे यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कें द्र सरकारने सुद्धा तीन वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेने डॉ. सोहन चवरे यांनी केली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार