पारडीजवळ अपघातामुळे तणाव

By Admin | Updated: April 24, 2016 03:01 IST2016-04-24T03:01:00+5:302016-04-24T03:01:00+5:30

कार बाजूच्या खड्ड्यात पडली आणि कारमधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले.

Tension due to an accident at Pardi | पारडीजवळ अपघातामुळे तणाव

पारडीजवळ अपघातामुळे तणाव

भीषण अपघातात तीन ठार
नागपूर : कार बाजूच्या खड्ड्यात पडली आणि कारमधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे आजूबाजूच्या मंडळींनी टिप्पर चालकाकडे धाव घेऊन त्याला खाली खेचले आणि बेदम चोप दिला. दरम्यान, कारमधील सर्वच जण गंभीर अवस्थेत असल्याचे ध्यानात आल्याने टिप्परचालकाची धुलाई करणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांना कारमधून बाहेर काढले. ती संधी साधून आरोपी टिप्परचालक पळून गेला.
जखमींपैकी शकुंतला रमणजी लोढा, उषा लक्ष्मीदास लोढा आणि निर्मला सुभाषचंद्र लोढा या तीन महिलांना मेयोतील डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंभीर अवस्थेतील सृष्टी, छाया आणि श्रेष्ठ प्रशांत लोढा या तिघांना धंतोलीतील कलर्स हॉस्पिटलमध्ये तर, श्रेया, अपेक्षा प्रशांत लोढा, प्रशांत लोढा, रमणजी लोढा, निर्मला उत्तमचंद लोढा यांना रहाटे हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यातील प्रशांत लोढा यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
या अपघातामुळे अपघातस्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने, कळमन्याचे ठाणेदार सुनील बोंडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी आणि रुग्णालयात पोहचले. नंदनवन आणि तहसील ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनीही धाव घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी मेयो आणि रहाटे रुग्णालयास भेट दिली. रुणालयासमोर मोठी गर्दी उसळल्याने तेथेही तणावाचे वातावरण होते.

आनंद सोहळ्यावर शोककळा
सूत्रांच्या माहितीनुसार, वर्धमाननगरातील शेअर व्यावसायिक अशोक कुमार हेमराज बरडिया यांचे नातेवाईक असलेले लोढा कुटुंबीय डॉ. हेमराज यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागपुरात आले होते. बरडिया परिवाराने आप्तस्वकियांसाठी छतरपूरच्या फार्म हाऊसमध्ये आनंद सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी लोढा परिवारातील सदस्य जात होते. त्यांना भीषण अपघात झाल्याचे कळताच आनंद सोहळ्यावर तीव्र शोककळा पसरली. समारंभात सहभागी मंडळींनी थेट रुग्णालयात धाव घेतली. मध्यरात्रीपर्यंत अनेकांचे जाणे-येणे सुरूच होते. प्रत्येकजण लोढा परिवाराबद्दल संवेदना व्यक्त करीत होता. अनेकांनी शक्य ती सर्वच मदत उपलब्ध करून दिली होती.

Web Title: Tension due to an accident at Pardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.