शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

विधानभवनावर निघालेल्या दिव्यांगांच्या मोर्चात तणाव, धक्काबुक्कीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:08 IST

वाहतूक कोंडी : पोलिसांना चकमा देऊन निघाले होते विधानभवनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी विधानभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी टेकडी मार्गावर अडविला. परंतु मोर्चात सहभागी काही दिव्यांग बांधव पोलिसांना चकमा देऊन विधानभवनाकडे निघाले होते. तर टेकडी मार्गावर इतर दिव्यांगांना अडविताना एका पोलिसाने मोर्चातील महिलेशी धक्काबुक्की केल्याचा आरोप करून दिव्यांग बांधवांनी रोष व्यक्त करून टेकडी मार्गावरील दुसऱ्या बाजूची वाहतूक रोखून धरली. संबंधित पोलिस माफी मागेपर्यंत दिव्यांग बांधव शांत बसणार नाहीत, असा पवित्रा घेतला, रात्री उशिरापर्यंत दिव्यांग बांधव मोर्चास्थळी ठिय्या मांडून बसले होते.

दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे, आशिष आमदरे, इरफान खान, राजन सिंग, मनोज राऊळ, उमेश गणवीर, नरेंद्र सौनडवले, रमेश ठाकरे, रोशन वंजारी, स्वी सुरस्कर, राजू राऊत, सुखदेव दुधलकर, राजेश खारेकर, देविदास मेश्राम, उषा लांबट, ज्योती बोरकर, उज्ज्वला खराबे यांनी दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करीत कठडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखून धरले. दिव्यांग बांधवांना रोखताना एका पोलिसाचा मोर्चातील महिलेला धक्का लागला. मात्र, संबंधित पोलिसाने जाणूनबुजून धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत दिव्यांग बांधवांनी टेकडी मार्गावरील दुस्त्या बाजूची वाहतूक रोखून धरली. संबंधित पोलिस माफी मागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतला. यावेळी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, उपपोलिस अधीक्षक अतुल सबनीस, सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे, पोलिस उपायुक्त राहूल मदने, धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्यासह पोलिसांनी दिव्यांग बांधवांची समजूत घालून त्यांना विधानभवनाकडे जाण्यापासून रोखले. रात्री उशिरापर्यंत दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले होते. 

मॉरिस कॉलेज चौकात वाहतूक विस्कळीत टेकडी मार्गावर पहिला मोर्चा आटोपल्यानंतर पोलिस दिव्यांग बांधवांच्या मोर्चाची वाट पाहत होते. परंतु अचानक टेकडी मार्गावरील दुसऱ्या बाजूने सुरू असलेल्या रस्त्याने दिव्यांगांचे नेते गिरीधर भजभुजे नारेबाजी करीत विधानभवनाकडे निघाले होते, ते मॉरिस कॉलेज चौकात थांबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु टेकडी मार्गावर उपस्थित असलेले विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांनी तातडीने तेथे जाऊन दिव्यांग बांधवांची समजूत घातली व त्यांना टेकडी मार्गावर परत आणले. मॉरेस कॉलेज ते टेकडी रोड आणि सीताबर्डीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असती.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर