लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील आहे.गोविंद ऊर्फ हेमरब महादेव देऊळकर (३३) असे आरोपीचे नाव असून, तो जयताळा येथील रहिवासी आहे. ही घटना जानेवारी-२०१५ मध्ये घडली. त्यावेळी पीडित मुलगी केवळ १४ वर्षे वयाची होती. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. २६ जुलै २०१५ रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक वि. दा. गोडबोले यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. आसावरी पळसोदकर यांनी बाजू मांडली.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात आरोपीला दहा वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:51 IST
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी बुधवारी हा निर्णय दिला. ही घटना एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील आहे.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचारात आरोपीला दहा वर्षांचा कारावास
ठळक मुद्देनागपूर विशेष सत्र न्यायालयाचा निकाल