अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:49 IST2018-08-18T00:48:00+5:302018-08-18T00:49:19+5:30
विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना कोराडी येथील आहे.

अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना कोराडी येथील आहे.
विष्णू ओमप्रकाश चव्हाण (१९) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १३ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. त्यावेळी पीडित मुलगी केवळ नऊ वर्षे वयाची होती. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला. पोलीस तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. ज्योती वजानी व अॅड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले.