शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दहा लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:06 IST

शाखेत रक्कम जमा करायला निघालेल्याच्या दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात आरोपींनी दहा लाखांची रोकड चोरून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देप्रतापनगरातील घटना : पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाखेत रक्कम जमा करायला निघालेल्याच्या दुचाकीच्या डिक्कीतुन अज्ञात आरोपींनी दहा लाखांची रोकड चोरून नेली.प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी रवींद्र नत्थुजी न बारई (रा. कोतवाल नगर, नागपूर) यांच्या भावाचा काटोल येथे रिफायनरी ऑईलचा कारखाना आहे. कारखान्याच्या व्यवहाराची रक्कम १० लाख रुपये बारई यांचेकडे काम करणारे कर्मचारी प्रशांत कांबळे आणि प्रशांत वंजारी हे दोघे गुरुवारी दुपारी २ वाजता घेऊन निघाले. ही रोकड त्यांना युनियन बँकेच्या गांधीबाग शाखेत जमा करायची होती. त्यांनी रोकड ज्युपिटर दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि बँकेत गेले. मात्र बँक बंद झाल्यामुळे ते आॅफिसकडे परत निघाले. छत्रपती नगरात आले असता पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्यांनी आपली दुचाकी उभी करून पाण्यापासून बचावासाठी आश्रय घेतला. तेवढ्यात दोन आरोपींनी दुचाकीची डिक्की उघडून त्यातील १० लाखाची रोकड लंपास केली. कांबळे आणि वंजारी यांनी या घटनेची माहिती बारई यांना दिली. त्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल केला.त्यानंतर आज सकाळी कांबळे आणि वंजारी यांना चौकशीसाठी बोलावले. मात्र ते वृत्त लिहिस्तोवर पोहोचले नव्हते.प्रकरणात संशयास्पद दुवेया प्रकरणात अनेक संशयास्पद दुवे असल्याचे पोलीस सांगतात.आम्ही आजूबाजूच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून घटना आणि आरोपीच्या संबंधाने चौकशी करीत आहो, असेही प्रतापनगर पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर