‘सेल्फी’चा मोह आवरला नाही
By Admin | Updated: February 21, 2016 02:33 IST2016-02-21T02:33:13+5:302016-02-21T02:33:13+5:30
वाघ दिसला नाही तरी चालेल, अशा प्रतिक्रिया पर्यटकांच्या होत्या. काळ्या रंगाचा आणि त्यावर पांढरे पट्टे असलेला टी शर्ट,....

‘सेल्फी’चा मोह आवरला नाही
नागपूर : वाघ दिसला नाही तरी चालेल, अशा प्रतिक्रिया पर्यटकांच्या होत्या. काळ्या रंगाचा आणि त्यावर पांढरे पट्टे असलेला टी शर्ट, निळ्या रंगाचा जिन्स आणि डोक्यावर हॅट घातलेला सचिन बघताच सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळून होत्या.
जंगल भ्रमंतीदरम्यान सचिनला ‘सेल्फी’चा मोह आवरता आला नाही. सेलिब्रेटी असूनही जमिनीवरच राहणे त्याने पसंत केले. काही गाईड आणि जिप्सी चालकांसोबतही त्याने छायाचित्र काढून घेतले. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेली असताना भ्रमंतीदरम्यान त्याची वागणूक अगदी सर्वसामान्यांसारखीच होती. मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्त होता. परंतु त्याच्या या भेटीचीही खबर नव्हती. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत सचिन आणि त्याच्या कुटुंबीयाने जंगल भ्रमंती केली. त्यानंतर पुन्हा दुपारी ३ वाजताच्या सुमारास सचिनने पुन्हा एकदा अभयारण्यात प्रवेश केला. शनिवारी रात्री त्याचा येथेच मुक्काम असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)