नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घराजवळील मंदीर हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:38 IST2019-09-17T23:37:01+5:302019-09-17T23:38:08+5:30
फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले.

नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घराजवळील मंदीर हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृत मंदिरांचे बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. महसूल व कृषी विभागाने ही कारवाई केली.
फुटाळा तलाव परिसरात कृषी विद्यापीठाच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने मंदिर हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाई शांततेत पार पडावी यासाठी लकडगंज पोलिसांची मदत घेण्यात आली.