तापमान खालावले, पुढचे तीन दिवस तुरळक पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:30+5:302021-03-14T04:07:30+5:30
नागपूर : २४ तासांपूर्वी नागपूरसह अन्य जिल्ह्यांत पडलेल्या पावसामुळे तापमान खालावले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस सर्वच ...

तापमान खालावले, पुढचे तीन दिवस तुरळक पावसाचे
नागपूर : २४ तासांपूर्वी नागपूरसह अन्य जिल्ह्यांत पडलेल्या पावसामुळे तापमान खालावले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस सर्वच जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला असून, तापमानाचा पारा संथगतीने वाढतीवर राहील, असे सांगितले जात आहे.
१२ मार्चनंतर या आठवड्यातील पुढचे चार दिवस तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या पावसामुळे शनिवारी दिवसभराचे तापमान खालावले. नागपुरातील किमान तापमानात ३.५ अंश सेल्सिअसने घट होऊन ३३.७ अंश सेल्सिअस अशी नोंद घेण्यात आली. यासोबतच वर्धा, गोंदियामधील तापमानातही घट झाली. वर्धा आणि बुलडाण्यातील तापमान ३४.४ अंश नोंदविण्यात आले. गोंदियात ३६ अंश, तर अकोल्यात ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमरावतीमध्ये ३३.८, तर वाशिममध्ये ३७ अंश तापमान नोंदविले गेले. चंद्रपुरातील तापमान शनिवारी विदर्भात सर्वाधिक म्हणजे ३९.४ अंश सेल्सिअस होते.
...
नागपुरात वादळ आणि पाऊस
नागपुरात शुक्रवारी रात्री वादळ आणि पावसाचा फटका बसला. विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्री अनेक भागांमध्ये वीजप्रवाह खंडित होता. चॉक्स कॉलनीत वीज प्रवाहामुळे तीन कुत्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
...
नागपुरात सर्वाधिक पाऊस
मागील २४ तासांमध्ये नागपूरसह वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यात पाऊस झाला. अन्य भागांतही सायंकाळनंतर वातावरण बदलले होते. वादळाचाही अनुभव रात्री आला. पावसाची हजेरी तीन जिल्ह्यांतच लागली. नागपुरात ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल वर्धामध्ये २.४, तर गोंदियामध्ये ०.६ मिलिमीटर पाऊस पडला.
...