शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नागपूरकरांना पुन्हा ताप, चंद्रपूरकरांनाही उकाड्याची धाप

By निशांत वानखेडे | Updated: June 13, 2024 19:50 IST

पारा पुन्हा वाढला, दिलासा क्षणिक : ४८ तासात पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय

निशांत वानखेडे, नागपूर : पूर्व विदर्भात बुधवारी मिळालेला पावसाळी गारव्याचा दिलासा क्षणिकच ठरला. गुरुवारी पुन्हा कमाल तापमानाने उसळी घेतली व नागपूर, चंद्रपूरचा पारा पुन्हा ४१ अंशाच्या वर चढला. त्यामुळे दिवसभर उकाड्याने छळ केला. दरम्यान हवामान विभागाने पुढच्या ४८ तासात पूर्व विदर्भात सर्वत्र पाऊस सक्रिय हाेईल, असा अंदाज वर्तविला आहे.

इतके दिवस जागेवर स्थिरावलेली माेसमी पावसाची बंगाल उपसागराची शाखा बुधवारी सक्रिय झाली व  अकाेला, पुसदच्या पुढे सरकत चंद्रपूर, गडचिराेलीपर्यंत पाेहचली. मंगळवारी रात्री काही भागात पावसाने जाेरदार हजेरी लावली आणि तापमान माेठ्या फरकाने खाली घसरले. ब्रम्हपुरी ४५ अंशावरून ३१ अंशावर आले. मात्र २४ तासात पुन्हा वातावरण बदलले. तापमान पुन्हा वधारले. ब्रम्हपुरी ८.४ अंशाने वाढून ३९.८ अंशावर पारा पाेहचला. चंद्रपूर सर्वाधिक ४१.८ अंश, तर नागपूर त्याखालाेखाल ४१.१ अंशावर चढले. गडचिराेलीतही तापमान ७.२ अंशाने वाढत ३८.२ अंशावर पाेहचले. त्यामुळे नागपूरसह इतर भागातही उकाड्यात वाढ झाली.

यापुढे ४८ तासात मान्सून पूर्व विदर्भातील भागात सक्रिय हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत नागरिकांची उष्णतेपासून पूर्णपणे सुटका हाेईल, अशी अपेक्षा करता येईल. महाराष्ट्राच्या इतर भागात सक्रिय झालेल्या पावसाचा जाेर पुढचे चार-पाच दिवस कमी हाेईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात