विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा !

By Admin | Updated: September 5, 2014 01:14 IST2014-09-05T01:14:02+5:302014-09-05T01:14:02+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Tell the students' well is well! | विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा !

विद्यार्थ्यांना सूचना ‘आॅल इज वेल’च सांगा !

नागपूर विद्यापीठ : ‘आयक्यूएसी’ने केली ‘नॅक’ची उजळणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून‘नॅक’ समिती (नॅशनल असेसमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन काञन्सिल)समोर जास्तीतजास्त चांगले सादरीकरण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ही समिती विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यासंदर्भात गुरुवारी ‘आयक्यूएसी’ (इंटर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल)तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची उजळणी तर घेण्यात आलीच, शिवाय समितीसमोर ‘आॅल इज वेल’ असेच सांगा अशा सूचना देण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘नॅक’ समिती १० सप्टेंबर रोजी विद्यापीठाला भेट देणार आहे. यासाठी विद्यापीठात युद्धस्तरावर तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांना याची रूपरेषा माहिती व्हावी व त्यांना नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात, यासाठी ‘आयक्यूएसी’ संचालक डॉ. सिद्धार्थ काणे यांनी गुरुनानक भवन येथे ‘कॅम्पस’मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘नॅक’ समिती १२ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधेल. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्तरे द्यावीत. विद्यापीठात काही नकारात्मक बाबी असल्या तरी सकारात्मक बाबींकडे डोळेझाक करणे योग्य ठरणार नाही, असे मत काणे यांनी यावेळी प्रदर्शित केले. (प्रतिनिधी)
पालकांना बोलविणार
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक पदव्युत्तर विभागप्रमुखांना १० विद्यार्थी व पालकांची नावे मागविण्यात आली आहेत. या विद्यार्थी-पालकांना ‘नॅक’सोबत संवाद साधता येणार आहे. विभागप्रमुखांनी धावपळ करून पालकांची नावे प्रशासनाला सादर केली. परंतु अनेक विभागांमध्ये विद्यार्थीच जिथे अनेकदा अनुपस्थित असतात तिथे त्यांच्या पालकांना बोलवणे ही तर परीक्षाच आहे, असे मत एका विभागप्रमुखाने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले.

Web Title: Tell the students' well is well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.