शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, या ‘चंद्रिकां’ची जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:02 IST

कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो.

ठळक मुद्देगतिमंद मुलींची व्यथा

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुखवस्तू कुटुंबातील मुलीही छळल्या जातात रोज, उघडकीस येते एखादीच ‘दामिनी-निर्भया’! घराचा रस्ता शोधताना भटकतात मुली, शोध लागतो तेव्हा सापडेच लागतात हाती आणि नामकरण होते ‘दिशा’!’’ रस्तोरस्ती निराधार दिशाहीन भटकणाऱ्या निर्व्याज-गतिमंद मुलींकडे तडफ नाही, आवाज नाही, म्हणून त्यांना ‘चंद्रिका’ म्हणायचे का! तर या चंद्रिका रोजच छळल्या जातात, रोज बलात्काराला बळी पडतात, त्यांचे काय? ही जबाबदारी कुणाची, समाजाची की सरकारची?गतिमंद मुले-मुली, हे काही परग्रहावरचे प्राणी नाहीत. ते सर्वपरिचित असले तरी त्यांना सांभाळण्याचा अनुभव प्रत्येकाजवळ असेलच असेही नाही. कुणी त्यांच्याकडे सहानुभूतीने बघतो तर कुणी तुसड्या नजरेने. अशी मुले-मुली कुटूंबात आहेत, ते सुरक्षित आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून सुरक्षा हा संशोधनाचाच विषय असला तरी किमान कुणाच्या तरी आधाराने ते जगत आहेत आणि त्यांना हवे-नको त्याची काळजीही घेतली जात आहे. मात्र, कुणाच्याही आधाराविना शहरात कुठेही इतस्त: फिरताना दिसतात, त्या ‘चंद्रिकां’चे काय? असा प्रश्न वर्तमानात घडणाऱ्या निर्भया, दिशांसारख्या प्रकरणांवरून सहजच उपस्थित होतो. सीताबर्डी, यशवंत स्टेडियम, उड्डाणपुलांच्या खाली भिंतीच्या आसºयाने अशा अनेक चंद्रिका निर्व्याज अवस्थेत बसलेल्या दिसून येतात. भान नसल्यामुळे त्या एकट्याच असतात. त्या शांत असतात, त्यांना देवध्यानीही म्हणतात आणि समाजाला त्यांची ओळख मतीमंद, गतीमंद अशी आहे. त्याही तुमच्या-आमच्यासारखे हाडामासांनीच बनल्या आहेत, आवाजही आहेच. फक्त तहान-भूकेच्या वेळीच त्यांचे शब्द फुटतात. शब्द फुटले रे फुटले, त्यांचे लचके तोडणाऱ्यांचा गलका सज्जच असतो. भानशुन्य असल्यामुळे त्यांच्या आवाजाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्या वेळेपुरती त्यांची तहान-भूक मिटलेली असते! आणि तो कळपही तृप्त झालेला असतो. अशा प्रकारे त्या रोजच निर्दयी हातांनी कुस्करल्या जातात. अशा चंद्रिकांसाठी शासन, प्रशासन आणि समाजाची जबाबदारी नाही का? यांच्यासाठी एक जबाबदार समाज म्हणून काय केले जाते? असे प्रश्न उपस्थित होतात.

शासन-प्रशासन काय करते?राज्यात कुणी उपाशी झोपू नये, कुणी उघड्यावर राहू नये आणि सर्वत्र शांतता-आनंद नांदावा हे कर्तव्य राज्यकर्त्यांचे आणि त्यांच्याकरवी योजना राबविणाऱ्या प्रशासनाचे असते. मात्र, शासन-प्रशासन अशा चंद्रिकांकडे सारासार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. कधीकाळी याच शहरात भीक मागून जगणाऱ्या दिसायला कुरूप, वेड्या आणि चक्क म्हाताऱ्या बाईला दिवस गेल्याची घटना पुढे आली होती. अशाच परिस्थितीला एका भीक मागणाऱ्या कोवळ्या गतिमंद मुलीलाही सामोरे जावे लागले होते. या घटना अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या ठरल्या. त्यानंतर मात्र त्यावर कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत, हेही सत्यच आहे.

म्हातारी गेल्यानंतर लेकीचे काय?शहरात काही ठिकाणी माय लेकीच्या जोड्या उघड्यावर भीक मागून जगत आहेत. म्हातारीचे वय ७०च्या वर आणि गतीमंद लेकीचे वय ३०-३५. अशा म्हाताऱ्या किती दिवस जगणार आणि त्यांच्यानंतर त्या गतिमंद लेकीचे काय होणार? हा सुन्न करणारा प्रश्न उपस्थित होतो. शहरातील काही स्थळांवर एखाद दुसरी तरुण मुलगी देवध्यानी अवस्थेत फिरताना दिसते. त्यातील बऱ्यापैकी देखणी आहे. मानसिक स्थिती आणि प्रासंगिक परिस्थितीमुळे तिचा चेहरा काळवंडलेला. रस्त्यावर बसून चपलांना देव मानून हातांनी टाळ्या वाजवून अंतर्मनीच्या देवाची आराधना करताना दिसते. नंदनवन, सक्करदरा, रेशीमबाग, हनुमाननगर अशा ठिकाणी ती दिसून येते. ती कशी जगत असेल? हा प्रश्न तिचे तीच जाणे.

टॅग्स :Socialसामाजिक