तहसील पोलिसांनी दारू तस्करांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:48+5:302021-03-14T04:08:48+5:30
तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर शुक्रवारी सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करीत असताना त्यांना भावसार चाैकाजवळ दोन भामटे संशयास्पद अवस्थेत दिसले. ...

तहसील पोलिसांनी दारू तस्करांना पकडले
तहसीलचे ठाणेदार जयेश भंडारकर शुक्रवारी सायंकाळी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त करीत असताना त्यांना भावसार चाैकाजवळ दोन भामटे संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांसोबत नजरानजर होताच त्यांनी आपली दुचाकी दामटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना भारतमाता चाैकाजवळ पकडले. त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता पोलिसांना ब्ल्यू इम्पेरियलच्या २० तर रॉयल स्टॅगच्या १६ बाटल्या आढळल्या. पोलिसांनी दारू आणि दुचाकी असा एकूण ४५,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना दारूबंदी कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार दिवटे आणि यादवला पोलिसांनी अटक केली. ठाणेदार जयेश भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेश ठाकूर, हवालदार आनंद दीक्षित, सुरेश पांडे, नायक प्रवीण मानापुरे आणि मुकुंद वारे यांनी ही कामगिरी बजावली.
---