पेंच, बोरसह उमरेडच्या पर्यटनासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:10 AM2020-09-15T00:10:24+5:302020-09-15T00:13:16+5:30

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या सोबतच, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. या आठवडाभरातच या संदर्भात आदेश निघण्याची शक्यता आहे.

Technical process for Umred tourism started with Pench, Bor | पेंच, बोरसह उमरेडच्या पर्यटनासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू

पेंच, बोरसह उमरेडच्या पर्यटनासाठी तांत्रिक प्रक्रिया सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या सोबतच, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन सुरू करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. या आठवडाभरातच या संदर्भात आदेश निघण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार (एनटीसीए) मागील चार महिन्यांपासून वन पर्यटन बंद आहे. आता वनविभागाने ताडोबा-अंधारीमधील पर्यटनासाठी आदेश काढले आहेत. देशभरात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन होते. एनटीसीएकडून जून महिन्यात पर्यटनाला मंजुरी मिळाली असली तरी पावसाळ्यामुळे देशभरातील वन पर्यटन बंद होते. देशातील बहुतेक वन पर्यटनस्थळे १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवली जातात. फक्त विदर्भातील व्याघ्र क्षेत्रात जंगलातील परिस्थिती पाहून १५ ते ३० जून या काळात ऑफलाईन प्रवेश दिला जातो. त्यानंतर पूर्णत: बंदी घातली जाते.
दरम्यान, पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला येथील पर्यटनासंदर्भात येत्या दोन दिवसात आदेश निघण्याची शक्यता असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचेक्षेत्र संचालक व वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी सांगितले आहे.

Web Title: Technical process for Umred tourism started with Pench, Bor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.