लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना उद्या बुधवारी व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मैदानावर क्रिकेटचा थरार सुरू रंगण्यापूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंनी सोमवारी पहाटे पेंचच्या जंगलात सफारीचा आनंद घेत 'चिल आऊट' केले.
यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने या सहलीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रवी बिश्नोई आणि रिंकू सिंग हे खेळाडू नागपूरपासून शंभर किमी अंतरावर असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत. हे खेळाडू ओपन जिप्सीमधून फिरताना, चहा-कॉफीचा घेताना आणि आस्वाद रात्रीच्या वेळी शेकोटीचा आनंद घेताना दिसत आहेत. या पोस्टला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असन. आतापर्यंत १ लाख २६ हजारांहून अधिक लाइक्स आणि १२०० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.
विदर्भातील ताडोबा आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या पेंच राष्ट्रीय अभयारण्यात वाघाचे जवळून दर्शन होईल या आशेपोटी हजारो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या या दोन्ही ठिकाणी दिग्गज क्रिकेटपटूंनी वेळोवेळी हजरी लावली.
तेंडुलकरच्या पावलावर पाऊल
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर तर अधूनमधून ताडोबा आणि कन्हांडला येथे जंगल सफारीसाठी येत असतो. अशातच नागपूरच्या सामन्याआधी संधीचा लाभघेत टीम इंडियातील काही खेळाडूंनी व्याघ्र दर्शन घेतले.
Web Summary : Before the India-New Zealand match, Indian team players, including Suryakumar Yadav, enjoyed a jungle safari at Pench National Park. They were spotted enjoying the scenery and a bonfire.
Web Summary : भारत-न्यूजीलैंड मैच से पहले, सूर्यकुमार यादव सहित भारतीय टीम के खिलाड़ियों ने पेंच राष्ट्रीय उद्यान में जंगल सफारी का आनंद लिया। दर्शनीय स्थलों और बोनफायर का आनंद लेते हुए खिलाड़ी देखे गए।