‘चिनी ड्रॅगन’विरोधात संघ करणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:45 IST2017-07-21T02:45:05+5:302017-07-21T02:45:05+5:30

सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्रमक

The team against the 'Chinese dragon' is Elgar | ‘चिनी ड्रॅगन’विरोधात संघ करणार एल्गार

‘चिनी ड्रॅगन’विरोधात संघ करणार एल्गार

स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात स्वदेशी सुरक्षा मोहीम: ‘चायनीज’ वस्तूंचा विरोध करणार, स्वदेशी जागरण मंचचा पुढाकार
योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. घरांघरांमध्ये ‘चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना याविरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उंचाविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत आॅगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून स्वदेशी पंधरवडाच राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
स्वदेशीला प्रोत्साहन देण्याची संघ परिवाराची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मात्र जागतिकीकरणाच्या लाटेत संघ परिवाराला अर्थव्यवस्थेवर चीनकडून झालेले आक्रमण थोपविता आले नाही. स्वस्त दरात विक्रीच्या नावाखाली चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंनी भारतीय बाजारपेठ काबीज केली. याचा फटका देशातील अनेक लहान उद्योगांना बसला तर अनेक पारंपरिक उद्योग अक्षरश: डबघाईस आले.
गेल्या काही दिवसांपासून डोकलामच्या मुद्यावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताने कठोर भूमिका घेतल्यामुळे चीनकडून वेगवेगळ्या माध्यमातून धमकी देण्यात येत आहे.

Web Title: The team against the 'Chinese dragon' is Elgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.