शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

विद्यापीठांप्रमाणे शिक्षकांचेही मूल्यांकन व्हावे - राज्यपाल रमेश बैस

By आनंद डेकाटे | Updated: September 4, 2023 15:54 IST

जीवन साधनासह शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण

नागपूर : विद्यापीठांच्या मानांकनाइतकेच शिक्षकांचे मानांकन (रँकिंग) महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालये आणि विद्यापीठांची चांगली निवड करण्यास मदत होईल. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केले जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षक मूल्यांकन आपली महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये देखील सुरू केले पाहिजे, असे मत विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी येथे व्यक्त केले.

सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात सोमवारी आयोजित समारंभात राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस म्हणाले, आपला देश अतिशय वैभवशाली होता. गतकाळातील हे वैभव पुन्हा प्राप्त करायचे असेल तर दर्जेदार शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. यासाठी शैक्षणिक गुणवत्ता ही जागतिक दर्जाची राखण्याची गरज आहे.

विद्यापीठांनी आपल्या प्रशासनात सुधारणा करावी आणि विद्यार्थी केंद्रीत धोरण आखावे, विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण हे महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या स्तरावरच व्हायला हवे. विविध परीक्षांच्या निकालांना होणारा उशीर ही बाब कुठल्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, महाविद्यालये व विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कुठलाही अधिकार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानाविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये एआय तंत्रज्ञानाची माहिती तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येण्याची गरज आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करणे तसेच विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. संचालन डॉ.अमृता इंदूरकर आणि डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले तर प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी आभार मानले.

नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव पुरस्कार- यांना मिळाला पुरस्कार- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कारडॉ. एच.एफ. दागीनावाला (नागपूर), प्रा. श्री. सुरेश देशमुख (वर्धा), डॉ. निरूपमा देशपांडे (अमरावती), शिवकिसन अग्रवाल (नागपूर), हरिश्चंद्र बोरकर ( भंडारा)- शिक्षण संस्था पुरस्कार - श्री. नागपूर गुजराती मंडळ, नागपूर.-डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक- डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर- प्राचार्य श्री बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक - श्री. प्रदीप बिनीवालेशताब्दी महोत्सव सुवर्ण पदक – डॉ. नितीन डोंगरवार, विभाग प्रमुख, श्री. वसीम अहमद, प्रवीण गोतमारे, राजेन्द्र बालपांडे, दर्पण गजभिये- आदर्श अधिकारी पुरस्कार – डॉ. रमण मदने, गणेश कुमकुमवार- आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार– प्रदीप घ्यार, अरूण हट्टेवार, विलास घोडे, भास्कर शेंडे-उत्कृष्ट प्राचार्य – डॉ. देवेंद्र एस. भोंगाडे, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, ता. नरखेड जि. नागपूरउत्कृष्ट शिक्षक – डॉ. प्रमोद खेडेकर, औषधी निर्माण शास्त्र विभाग, डॉ. ईश्वर के. सोमनाथे, विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूर वर्धा.- उत्कृष्ट संशोधकडॉ. रविन एन. जुगादे, रसायनशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक विभागडॉ. रतिराम गो. चौधरी, सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, कामठी जि. नागपूर संलग्नित महाविद्यालयातून- उत्कृष्ट लेखकडॉ. सत्यप्रकाश एम. निकोसे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ- उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार – विशाल राजकुमार खर्चवाल, शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर.अनुश्का नाग (महिला प्रवर्ग), हिस्लॉप कॉलेज, नागपूर.- उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार : आशुतोष अजय तिवारी, आर. एस. मुंडले धरमपेठ आर्टस ॲन्ड कामर्स कॉलेज, नागपूर, अश्लेषा राजेश खंते (महिला प्रवर्ग), नबिरा महाविद्यालय, काटोल.-उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार – साहिल भिमराव खेलकर, जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा.आरजु समिर खान पठान, जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा.उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार – मनिष प्रमेलाल कडुकर, (पुरुष प्रवर्ग), विज्ञान संस्था, नागपूर, पृथ्वी अनिल राउत, (महिला प्रवर्ग), विज्ञान संस्था नागपूर.शासकीय अधिकारी : प्रियदर्शनी बोरकर, तत्कालीन तहसीलदार, नागपूर (शहर) व वर्तमान तहसीलदार हिंगणा नागपूर (शहर), राजेश आनंदराव देठे, मंडळ अधिकारी, तहसीलदार नागपूर (शहर) कार्यालय, ॲड. प्रमोद उपाध्याय, विद्यापीठ अधिवक्ता विद्यापीठ आंतर -महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा :-लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - दि क्लॉक टॉक्स-हिस्लॉप कॉलेज, टेम्पल रोड, सिव्हिल लाईन नागपूर - दी हिस्लोपीएन-कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर – कमलगंधा,- बॅरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा जि. नागपूर –कुसुमगंध,- यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर जी. भंडारा – यशवंत,- गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालय, वर्धा – अर्थसंदेश,- श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ जी. जळगाव - मानस

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरEducationशिक्षणTeacherशिक्षक