शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST2021-02-05T04:50:59+5:302021-02-05T04:50:59+5:30
एकाच पदावर आणि एकाच वेतनश्रेणीत सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात येते. अशा जवळपास ...

शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणीपासून वंचित
एकाच पदावर आणि एकाच वेतनश्रेणीत सलग १२ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात येते. अशा जवळपास १४२ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव मागील तीन महिन्यांपूर्वीच शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आला होता. सामान्य प्रशासन विभागाकडून या प्रस्तावाबाबत काही आक्षेप नोंदविण्यात आले, परंतु शिक्षण विभाग आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चेच्या नावाखाली हा प्रस्ताव मागील तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. सेवा शर्ती व नियम आणि शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनांच्या आधारे निर्णय घेऊन पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, अनिल नासरे, दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजू बोकडे, सुरेश श्रीखंडे, मीनल देवरणकर, कल्पना इंगळे आदींनी केली आहे.